कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगने शेतकऱ्यांचे उत्पन्न झाले ‘दुप्पट’ , आता मोठ्या कंपन्यांनी साधला संपर्क

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कंत्राटी शेती (करारावर शेती) हे नवीन कृषी कायद्यांना विरोध करण्याचे एक कारण आहे. परंतु ते स्वीकारून मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील शेतकरी विष्णू शर्मा यांनी केवळ दोन वर्षांत त्यांचे वार्षिक उत्पन्न दोन वरून पाच लाख रुपये केले. खडबडीत जमीन कमी सुपीक मानली जाते, पण दुल्हागन गावच्या विष्णूने कठोर परिश्रम करून नवीन मार्ग अवलंबून आपले आयुष्य बदलले. सहसा, शेतकरी एका वर्षात दोन  पारंपारिक पीक  गहू आणि मोहरी घेण्यास सक्षम असतात, परंतु विष्णू वर्षाला चार पिके घेत आहेत. उत्तर प्रदेशातील व्यापारांशी करार करून फळांचे उत्पादन करीत आहेत. विष्णूचा  दावा आहे की,  मोठ्या कंपन्यांनीही आयुर्वेद औषधांमध्ये वापरल्या जाणार्‍या पांढर्‍या मसुली आणि सेंद्रीय भाजीपाला यासाठी त्यांच्याकडे संपर्क साधला आहे.

विष्णूकडे 70 एकर जमीन आहे. 2017 पासून ते 50 एकरमध्ये गहू, उडीद, मूग व तिळाची पिके घेत आहेत. 20 एकर जमीनही शेतीसाठी बनविण्यावर काम सुरु आहे. उत्तर प्रदेशच्या इटावा व्यापाऱ्यांसाठी  त्यांनी सुमारे 300 पपईची झाडे आणि 270 पेरूची झाडे लावली आहेत. हा प्रकल्प इटावाच्या व्यापाराने  उपलब्ध करून दिला आहे आणि ते कराराअंतर्गत फळांची खरेदी करत आहेत. विष्णूने गेल्या वर्षी पेरू आणि पपईपासून दोन लाख रुपयांची कमाई केली होती. डाळिंब आणि पपई पासून देखील 1 लाख रुपये मिळविले.

रोजगाराच्या शोधात सोडावे लागले  गाव
पारंपारिक शेतीत फारसा नफा मिळाल्यामुळे 2000 मध्ये विष्णूने गाव सोडले आणि जवळच्या फूफ शहरात नोकरी केली पण समाधान मिळाले नाही.  2017 मध्ये नवीन पद्धतीने शेतीची कल्पना तयार केली. इटावा मधील फळ व्यापाऱ्यांशी  संपर्क साधला. त्याने रासायनिक खताचा वापर न करता उगवलेले पेरू आणि पपईची मागणी केली. सेंद्रिय शेतीची पद्धत शिकण्यासाठी विष्णूने आपल्या मुलाला उत्तर प्रदेशातील कन्नौज येथे पाठवले. आता संपूर्ण कुटुंब शेतीच्या मध्यभागी बांधलेल्या मोठ्या घरात एकत्र राहतात.

उत्पन्न वाढविण्यासाठी  तंत्रज्ञान  बनले आधार शेतात रोखीची पिके घेतली गेली तेव्हा त्यांच्या सुरक्षिततेची एक मोठी समस्या समोर आली. हरियाणाच्या शेतकर्‍यांनी वापरलेल्या झटका तंत्राचा त्यांनी अवलंब केला. यामध्ये शेताभोवती लोखंडी  पातळ तार लावली जाते. हे तार एका विशेष डिव्हाइसशी जोडलेले आहे. याच्या संपर्कात येताच, जनावरांना सौम्य झटका बसतो आणि सायरन वाजतो. हे निराधार प्राण्यांना पिकांपासून दूर ठेवण्यास मदत करते. पाळत ठेवण्यासाठी त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरेसुद्धा लावले आहेत.

बिग बाजारासाठी सेंद्रिय कारले आणि गाजर पिकवण्याचा प्रस्ताव
विष्णू म्हणतात की,  पतंजलीने पांढऱ्या  मसुलीसाठी प्रति एकर दीड लाख रुपये देण्याचा प्रस्ताव दिला आहे. बिग बझारने सेंद्रीय मार्गाने कारले  आणि गाजर पिकविण्यासाठी संपर्क साधला आहे. दोन्ही प्रस्तावांच्या संदर्भात ते तयारी करीत आहेत. भिंडचे कृषी सहाय्यक संचालक रामसुजन शर्मा म्हणाले की, विष्णू शर्मा यांनी प्रशंसनीय काम केले आहे. जिल्ह्यातील इतर शेतकरीदेखील त्यांच्या नवकल्पनांकडून शिकू शकतात.