मुलीचा साखरपुडा उरकून परतताना पोलीस अधिकाऱ्यावर काळाचा घाला

राजगड (मध्यप्रदेश) : वृत्तसंस्था – मुलीचा साखरपुडा उरकून परतताना झालेल्या भीषण अपघातात एका पोलीस उप निरीक्षकाचा मृत्यू झाला. कार आणि डंपरच्या धडकेत कारमधील पोलीस उप निरीक्षक अशोक तिवारी यांचा होरपळून मृत्यू झाला.

घटनेच्यावेळी कारमध्ये आणखी दोन जण असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही. ही घटना राजगढ जिल्ह्यातील बोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. अशोक तिवारी हे लिमाचौहान पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत होते.

राजगढ जिल्ह्यातील बोडा-कंडारा कोठरी दरम्यान कार आणि डंपरची समोरासमोर धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की या धडकेत कारने पेट घेतला. यामध्ये पोलीस उप निरीक्षक अशोक तिवारी यांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेत दोन्ही वाहनांनी पेट घेतल्याने या मार्गावरील वाहतूक काही वेळासाठी ठप्प झाली होती. अपघाताची माहिती मिळताच राजगढ पोलीस अधीक्षक प्रदीप शर्मा आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल झाले.

ड्युटीवर परतताना झाला अपघात

राजगढ जिल्ह्यातील लिमाचौहान पोलीस ठाण्यातील प्रभारी पोलीस उप निरीक्षक अशोक तिवारी हे भोपाळचे रहिवाशी आहेत. काही दिवसांपूर्वी सुट्टी घेऊन ते मुलीच्या साखरपुड्यासाठी इलाहाबाद येथे गेले होते. इलाहाबाद येथून रविवारी सकाळी ते भोपाळ येथील घरी आले होते. त्यानंतर ते ड्युटीवर हजर होण्यासाठी जात असताना नरसिंहगड जवळ हा अपघात झाला.

आरोग्यनामा ऑनलाइन – 

शाकाहारी पुरुष पार्टनरला करतात पूर्ण संतुष्ट

महिलांनो, नॅचरल ग्लो हवाय? मग अवश्य करा ‘हे’ उपाय

सौंदर्य वृद्धीसाठी प्राचीन काळापासून केले जाता ‘हे’ आयुर्वेदिक उपाय

आता ‘डिओ’ला विसरा ; ‘हा’ रस दूर करेल शरीराची दुर्गंधी