खा. नुसरत जहाँ आणि मिमी चक्रवर्तीचा ‘माँ दुर्गा’ गाण्यावर ‘डान्स’ (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन टीम – पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजा पाहण्यासारखी असते. हे महापर्व सुरु होण्याआधीच आता लोकसभा खासदार नुसरत जहाँ आणि मिमी चक्रवर्ती यांनी दुर्गा देवीच्या गाण्यावर डान्स केला आहे. दोन्ही खासदारांचा हा व्हिडीओ सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. अद्याप युट्युबवर हा व्हिडीओ 9 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. फेसबुकवरही या व्हिडीओला 10 लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत.

दोन्हीही खासदार बंगाली फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. या दोघींसोबत अभिनेत्री सुभाश्री गांगुलीही डान्स करताना दिसत आहे. दुर्गापूजेचं पर्व 3 ते 8 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. या गाण्याला टॉलीवूड कंपोजर इंद्रदीप दास गुप्ता यांनी कंपोज केलं आहे. नुसरत यांनी काही दिवसांपूर्वीच एक बंगाली सिनेमा साईन केला आहे. या सिनेमाचं नाव ‘असुर’ असून याचे दिग्दर्शक पावेल आहेत.

त्यांनी सांगितलं की, “असुरची कथा तीन मित्रांभोवती फिरते. यात तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ व्यतिरीक्त अभिनेता अबीर चॅटर्जी आणि जीत यांना साईन करण्यात आलं आहे.

पावेलला जेव्हा विचारण्यात आलं की, नुसरत जहाँ खासदार आहेत. त्यांच्या बिजी शेड्युलमुळे अडचण येऊ शकते. यावर ते म्हणाले, “नुसरत प्रोफेशनल आणि जबाबदार आहेत. त्या जीत आणि अबीर समोर आपली भूमिका चांगल्या प्रकारे निभावतील.

नुसरत यांनी आपल्या ट्विटरवरून सिनेमाचं टीजर पोस्टर रिलीज केलं होतं. त्यांनी लिहिलं होतं की, “या थंडीमध्ये हा सिनेमा रिलीज होईल.” त्यांचा शेवटचा बंगाली सिनेमा नकाब होता. लवकरच असुरची शुटींग सुरु होणार आहे.

Visit :- policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like