MP OBC Political Reservation | महाराष्ट्रानंतर मध्‍य प्रदेश सरकारलाही ‘सुप्रीम’ झटका ! पंचायत निवडणुकांची अधिसूचना 2 आठवड्यात काढण्याचे SC चे निर्देश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – MP OBC Political Reservation | दोन दिवसापुर्वी सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) महाराष्ट्रातील आबोसींच्या राजकीय आरक्षण प्रकरणी महाराष्ट्र सरकारला (Maharashtra State Government) धक्का दिला होता. दोन आठवड्याच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर करा, असा आदेश दिला होता. यानंतर आता मध्‍य प्रदेश ओबीसी राजकीय आरक्षण प्रकरणी (MP OBC Political Reservation) आज (मंगळवारी) सुप्रीम कोर्टाने मोठा आदेश दिला आहे.

आगामी पंधरा दिवसामध्ये पंचायत निवडणुकांची अधिसूचना काढा , असा आदेश सुप्रीम कोर्टाने मध्‍य प्रदेश सरकारला (Madhya Pradesh Government) दिला आहे. यामुळे मध्य प्रदेश सरकारला देखील न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. दोन आठवड्यांत पंचायत निवडणुकांची अधिसूचना काढा. ज्‍या स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांची मूदत संपली आहे. येथे निवडणुका घ्‍याव्यात, असं न्‍यायालयानं स्‍पष्‍ट केलं आहे.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्यानुसार, मध्‍य प्रदेश निवडणूक आयोगाने (Madhya Pradesh Election Commission) निवडणुकीची तयारी सूरु करावी.आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण न करताच ओबीसी आरक्षण देणे चुकीचे आहे. ट्रीपल टेस्‍टपूर्वी ओबीसी राजकीय आरक्षण शक्‍य नाही, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

Web Title : MP OBC Political Reservation | After maharashtra OBC reservation in local body
election set back for madhya pradesh goverment in supreme court

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा