MP Omraje Nimbalkar | खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न, पण…

धाराशीव : MP Omraje Nimbalkar | ठाकरे गटाचे Shivsena (UBT) धाराशीव जिल्ह्याचे (Dharashiv District) खासदार ओमराजे निंबाळकर (MP Omraje Nimbalkar) यांच्या अंगावर डम्पर घालण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी सकाळी घडला. आपल्या राहत्या घरापासून काही अंतरावरच ते सकाळी मॉर्निंग वॉकला (Morning Walk) गेले होते. व्यायाम करून घरी परतत असताना तेव्हा एक भरधाव डम्पर त्यांच्या अंगावर आला. प्रसंगावधान राखत खासदार ओमराजे यांनी रस्त्याच्या कडेला उडी मारल्याने मोठा अनर्थ टळला.

याबाबत माहिती अशी, की खासदार ओमराजे निंबाळकर (MP Omraje Nimbalkar) यांच्या गावालगतच ही घटना घडली. ओमराजे हे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गोवर्धनवाडी येथील आपल्या राहत्या घरापासून काही अंतरावरच गेले होते. व्यायाम करून घरी परतत असताना पाठीमागून येणाऱ्या भरधाव डम्परचा त्यांना आवाज आला. निंबाळकर यांनी पाठीमागे वळून पाहिले डम्पर मोठ्या वेगाने त्यांच्या दिशेने येत असल्याचे दिसले. यावेळी डम्पर चालकाच्या हातात मोबाईल होता. तर तो त्याची डावी बाजू सोडून उजव्या बाजूने येत असल्याने ओमराजे यांनी रस्त्याच्या खाली उडी मारली. तेव्हा डम्पर पुढे निघून गेला. यावेळी ओमराजे निंबाळकर यांनी पाठीमागून येत असलेल्या मोटरसायकलवर बसून डम्परचा पाठलाग करून रेल्वे गेट परिसरात त्याला गाठले.

रामेश्वर कांबळे (Rameshwar Kamble) असे या डम्पर चालकाचे नाव आहे. ओमराजे निंबाळकर यांनी त्यांच्यासोबत घडलेल्या या घटनेची फिर्याद ढोकी पोलीस स्टेशन (Dhoki Police Station) येथे दिली असून ढोकी पोलिसांनी डम्पर चालकाविरोधात (Dumper driver) गुन्हा (FIR) नोंद केला आहे. बाईकवाल्याला ओव्हरटेक करताना हा प्रकार घडल्याचा जबाब चालकाने दिला आहे. सदर प्रकार हा चालकाच्या चुकीमुळे झाला? की यामागे काही घातपाताचा हेतू होता का? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Web Title : MP Omraje Nimbalkar | dharashiv shivsena ubt mp omraje nimbalkar escaped the accident

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Gold Rate Today | सोन्याच्या दरात किंचित घसरण; आजचा पुण्यातील भाव काय? जाणून घ्या

MLA Varsha Gaikwad | काँग्रेसमध्ये भाकरी फिरली, भाई जगताप यांची मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदावरुन उचलबांगडी; वर्षा गायकवाड नवीन अध्यक्ष

Maharashtra Politics News | एका पोलीस अधिकाऱ्यामुळे भाजप-सेना युतीत धुमसतंय?, MP श्रीकांत शिंदेंचा राजीनाम्याचा इशारा