…म्हणून त्याने गर्लफ्रेन्डची गळा चिरून केली हत्या, हळदी दिवशीच नवरदेवाला पोलिसांनी केली अटक

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  गर्लफ्रेन्डची हत्या केल्याप्रकरणी घरात हळद लागत असलेल्या नवरदेवाला पोलिसांनी अटक केली. आरोपीला अटक केल्यानंतर त्याने जो खुलासा केला तो ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. मध्यप्रदेशच्या कॅंट पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे.

संजय कोरी असे अटक केलेल्या नवरदेवाचे नाव आहे. लक्ष्मी तोमर असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. 30 एप्रिल रोजी एका महिलेचा मृतदेह बेवारस स्थितीत आढळला होता. ओळख पटेल असा कोणताही पुरावा तिच्याजवळ पोलिसांना सापडला नव्हता. त्यामुळे पोलिसांनी ओळख पटवण्यासाठी सोशल मीडियावर महिलेच्या मृतदेहाचा फोटो शेअर केले होते. त्यावेळी पोलिसांना माहिती मिळाली की, लक्ष्मी तोमर असे महिलेचे नाव असून ती शिवपुरी जिल्ह्यातील बदरवासमध्ये ब्युटी पार्लर चालवत होती. नंतर धागेदोरे सापडल्याने पोलिसांनी आरोपी संजय कोरीला अटक केली. त्यावेळी आरोपीने सांगितले की, त्याचे आणि महिलेचे अनैतिक संबध होते. महिलेचा घटस्फोटीत होती. त्यामुळे तिने त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती. मात्र आरोपीला त्याच्यासोबत लग्न करायचे नव्हते. त्यामुळे आरोपीने महिलेच्या हत्येचा कट रचला. आरोपीने तिला लग्न करू या असे सांगून तिला गुना येथे बोलावले. आरोपीच्या बोलण्यात ती फसली आणि त्याच्यासोबत गेली. मात्र, रस्त्याच्या मधेच 30 एप्रिल रोजी आरोपीने तिचा गळा चिरून हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह झाडांमध्ये फेकून दिला. दरम्यान 8 मे रोजी आरोपीचे लग्न होणार होते. त्याआधीच हळदी दिवशी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.