ऑनलाईन क्लास सुरु असताना मुलांच्या मोबाईल वर सुरु झाला पॉर्न व्हिडीओ, पालकांमध्ये गोंधळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशभरात सध्या लॉकडाउनमुळे शाळा कॉलेज मध्ये ऑनलाईन क्लास घेतले जात आहेत. अशामध्ये मुलांना घरात बसून लॅपटॉप किंवा मोबाईल वरूनच ऑनलाईन क्लास करावे लागत आहेत. ऑनलाईन क्लास वरून देशातील कानाकोपऱ्यातून विविध घटना ऐकायला मिळत आहेत. मध्य प्रदेशातील श्योपुर मधून अशीच एक घटना समोर आली आहे. मुलांचा ऑनलाईन क्लास सुरु असताना अचानक त्यांच्या मोबाईलवर पॉर्न व्हिडीओ सुरु झाला त्यानंतर पालकांमध्ये एकच गोंधळ उडाला.

माहितीनुसार, मध्य प्रदेशातील श्योपुर मध्ये इयत्ता 8वी च्या मुलांचा ऑनलाईन क्लास सुरु होता, तेव्हा मोबाईलवर अचानक अश्लील व्हिडीओ चालू झाला त्यानंतर पालकांमध्ये एकच गोंधळ उडाला. हा व्हिडीओ सुरु झाल्याचे पाहून सर्व पालकांना याचे मोठे आश्चर्य वाटले.

या घटनेनंतर सर्व पालकांनी त्या संबंधित शिक्षकाची कानउघडणी केली. अशा प्रकारचा व्हिडीओ मुलांच्या मोबाईलवर चालताना पाहून पालकांना धक्का बसला. एका अधिकाऱ्याने सांगितले की त्यानंतर हा व्हिडीओ लगेच बंद करण्यात आला आणि क्लास थांबवण्यात आला.

श्योपुर मध्यप्रदेशातील सीमावर्ती जिल्ह्यांपैकी एक आहे जो राजस्थानच्या सवाई माधोपुर जिल्ह्याच्या जवळ आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितलं की हे एखाद्या शिक्षकांचं काम नसून हॅकर्सने केलेलं असेल. सर्व काही सुरळीतपणे सुरु असताना अचानक असं झालं त्याला शाळा जबाबदार नाही. आता बंदोबस्त वाढवण्यात येणार आहे मग ऑनलाईन क्लास सुरु केले जातील.