MP Pratap Patil Chikhlikar | ‘राज्यात येत्या 2-3 दिवसात भाजपचे सरकार येईल, फडणवीस मुख्यमंत्री होतील’; भाजप खासदाराचं मोठं विधान

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – MP Pratap Patil Chikhlikar | शिवसेनेत (Shivsena) फूट पडल्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. राज्यात सत्ताबदलाचे वारे वाहू लागले असल्याने शिंदे गट भाजपला (BJP) पाठींबा देण्याच्या चर्चा होत आहेत. कालच्या बंडखोर आमदारांना सुप्रीम कोर्टाकडून (Supreme Court) दिलासा मिळाल्यानंतर भाजपच्या गोटात देखील हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. अशातच भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

 

प्रताप पाटील चिखलीकर (MP Pratap Patil Chikhlikar) म्हणाले, “येत्या दोन ते तीन दिवसात राज्यात भाजपचं सरकार येईल. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री होतील.” तसेच ते आषाढी एकादशी निमित्त पंढपूरच्या विठ्ठल रुक्मिणीची महापूजा करतील असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच, एकनाथ शिंदे यांच्या केसालाही धक्का लागणार नाही. आमदारांबरोबरच शिवसेनेचे 10 ते 12 खासदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत येतील,” असा इशाराही त्यांनी दिला.

 

दरम्यान, शिंदे गटाच्या आक्रमक पवित्र्यामुळे आता राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आल्याचं दिसत आहे.
भाजपने आपल्या सर्व आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर अपक्षांनाही हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
चिखलीकर यांनी केलेल्या या विधानाने राज्यात राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

 

Web Title :- bjp mp pratap patil chikhlikar said bjp government will come in the next two to three days devendra fadnavis will be the chief minister

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा