MP Rahul Shewale | ‘खोटे फोटो दाखवून बदनामी करण्याचा प्रयत्न, माझी NIA कडून चौकशी करा’ – खासदार राहुल शेवाळे (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिंदे गटाचे (Shinde Group) खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांच्या विरोधात एका महिलेने काही महिन्यांपूर्वी साकिनाका पोलीस ठाण्यात (Sakinaka Police Station) तक्रार केली आहे. या महिलेने राहुल शेवाळे यांनी अत्याचार केल्याचा दावा केला आहे. याच तक्रारीचा धाक पकडून विरोधकांनी शेवाळे याना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. तक्रारदार महिलेला मुंबईमध्ये येऊ दिले जात नसल्याने तिला संरक्षण द्यावे, अशी मागणी ठाकरे गटाच्या (Thackeray group) नेत्या मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी केली आहे. या सर्व प्रकरानंतर खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांनी आज (रविवार) सकाळी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत.

https://www.facebook.com/RRShewale/videos/898133931370304 

 

पत्रकार परिषदेमध्ये खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांनी तक्रारदार महिलेच्या संपूर्ण कुटुंबाचा गुन्हेगारी इतिहास असल्याचा दावा केला आहे. तसेच या महिलेला मी कोरोना काळात मदत केली होती. परंतु नंतर या महिलेच्या अपेक्षा वाढत गेल्या. या महिलेने नंतर मला ब्लॅकमेल (Blackmail) करायला सुरुवात केली, असाही दावा शेवाळे यांनी केला. या प्रकरणाची NIA कडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे केली आहे.

मला उद्धव ठाकरेंनी मदत केली

ही महिला दुबईची असून तिने पाकिस्तानी एजंटच्या (Pakistani Agent) मदतीने फेक अकाऊंट चालवले होते. माझ्या पत्नीला वारंवार धमक्या आल्याचे शेवाळे यांनी सांगितले. ही महिला खोट्या तक्रारी करत असल्याची माहिती मी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिली होती. यानंतर त्यांनी याबाबत लक्ष घालण्यास तत्कालीन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांना सांगितले होते. याप्रकरणी मला उद्धव ठाकरे यांनी मदत केली होती, असेही शेवाळे यांनी सांगितले.

 

चुकीची माहिती पसरवली
शिवसेना (Shivsena) सोडल्यानंतर युवासेनेचे पदाधिकारी आणि राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यकर्त्यांनी माझ्याबद्दल चुकीची माहिती पसरवली आहे. युवासेना प्रमुखांमुळे या गोष्टी घडल्या असल्याचे म्हणत राहुल शेवाळे यांनी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर निशाणा साधला. या महिलेला युवासेनेचे पदाधिकारी फॉलो करत असल्याचेही शेवाळे यांनी सांगितले.

 

…तर त्याचवेळी माझ्यावर कारवाई झाली असती
या महिलेचा पाकिस्तानी ग्रुप आहे. ही महिला दाऊद गँगशी (Dawood Gang) संबंधित असल्याचा गौप्यस्फोट शेवाळे यांनी केला.
हे प्रकरण साधसुधं नसून दाऊद गँगशी संबंधित आहे. त्यामुळे या प्रकरणाची NIA च्या
माध्यमातून चौकशी करण्यात यावी अशी मागणी शेवळे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली.
जर मी दोषी असतो तर त्याचवेळी कारवाई झाली असती असेही शेवाळे यांनी सांगितले.
या महिलेला युवासेना प्रमुख (Yuva Sena Chief) पाठीशी घालत असल्याचे शेवाळे म्हणाले.

 

Web Title :- MP Rahul Shewale | an attempt to defame me says shinde group mp rahul shewale news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MP Sanjay Raut | बिल्डर सूरज परमारच्या डायरीत कुणाचं नाव? संजय राऊतांची SIT चौकशीची मागणी

Ashish Shelar | संजय राऊतांनी रावणरक्षा वाचण्यापेक्षा रामरक्षा वाचावी – आशिष शेलार

Shambhuraj Desai | ‘बाळासाहेबांनी इतरांना आधार दिला आता त्यांच्याच मुलाला आणि नातवाला…’; शंभूराज देसाईंची उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र