MP Rahul Shewale | राहुल शेवाळेंचा गौप्यस्फोट; म्हणाले – ‘उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यानुसारच आम्ही…’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शिवसेनेच्या लोकसभेतील 12 खासदारांसह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज दिल्लीतील महाराष्ट्र सदनात (Maharashtra Sadan) पत्रकार परिषद घेतली. यावेळी नवनियुक्त गटनेते राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सांगितले की भाजपशी युती (BJP Alliance) करण्याचा मी देखील प्रयत्न करतोय, तुम्ही तुमच्या सोर्सने प्रयत्न करा, प्रयत्न सुरु ठेवा. म्हणून मग आमचे सोर्स एकनाथ शिंदे आहेत, उद्धव ठाकरेंच्या सांगण्यानुसार आम्ही 12 खासदारांनी वेगळी भूमिका घेतली, असे राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) म्हणाले.

 

राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी बैठकीत सांगितलं होत की, मी माझ्या परीने युती करण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांनी या गोष्टीचा उल्लेख केला की, ते जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना दिल्लीत भेटायला गेले होताे. त्या भेटीत त्यांनी युतीचा उल्लेख केला. मोदींसोबत त्यांची एक तास चर्चा झाली. युती संदर्भात ही चर्चा होती. ही बैठक जूनमध्ये झाली आणि जुलैला अधिवेशनात भाजपच्या 12 आमदारांवर निलंबनाची कारवाई झाली. त्यामुळे भाजपला असं वाटलं की, एकीकडे युतीची चर्चा होत आहे. दुसरीकडे 12 भाजप आमदारांवर निलंबनाची कारवाई झाली. त्यामुळे भाजप प्रमुखांमध्ये नाराजी निर्माण झाली.

राहुल शेवाळे पुढे म्हणाले, अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी राजीनामा (Resignation) देताना फक्त मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
एनडीएचं (NDA) समर्थन काढलं, असं कोणतंही पत्र दिलेले नव्हतं, इथून पुढे आमचं समर्थन एनडीएला असेल, असेही ते म्हणाले.

 

Web Title :- MP Rahul Shewale | cm eknath shinde press conference separate group of shivsena in
the parliament sent a letter to the loksabha speaker om birla rahul shewale group leader and bhavana gawli chief whip

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा