MP Rajan Salvi | अंगावर आल्यानंतर शिंगावर घ्यावे लागते ही भूमिका आमची आहे आणि कुणी अंगावर आला तर.., राजन साळवींचा इशारा

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे – Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाचे आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) यांच्या चिपळूण येथील राहत्या घरावर दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचा ठाकरे गटाचे खासदार राजन साळवी (MP Rajan Salvi) यांनी निषेध व्यक्त केला आहे. अंगावर आल्यानंतर शिंगावर घ्यावे लागते ही भूमिका आमची आहे आणि कुणी अंगावर आला तर शिंगावर घेऊ, असा इशारा राजन साळवी (MP Rajan Salvi) यांनी दिला.

अंगावर आल्यानंतर शिंगावर घ्यावे लागते ही भूमिका आमची आहे आणि कुणी अंगावर आला तर शिंगावर घेऊ. भास्कर जाधव हे शिवसेनेचे आक्रमक नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या मनात जे असते, तेच त्यांच्या ओठांवर असते. गेल्या वीस वर्षांच्या महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत आरोप करणे आणि भ्याड हल्ले करणे सुरु आहे. भविष्यात असे होता कामा नये. विध्वंसक वृत्तीच्या लोकांना जनता येणाऱ्या निवडणुकांत त्यांची जागा दाखवून देणार आहे. नारायण राणे (Narayan Rane) आणि कुटुंबिय आमचे विरोधक आहेत. पण त्यांना बाळासाहेब ठाकरेंचा (Balasaheb Thackeray) आशीर्वाद लाभल्याने ते मोठे झाले आहेत, असे राजन साळवी (MP Rajan Salvi) म्हणाले.

तसेच रत्नागिरी जिल्ह्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचेच वर्चस्व कायम राहणार आहे.
आम्ही ठाकरे गटाचा कोकण बालेकिल्ला कायम राखल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी आमचे अभिनंदन देखील केले आहे.
त्यामुळे महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) माध्यामातून आम्ही सर्व एकसंघ आहोत,
असेही राजन साळवी म्हणाले.

कुडाळ तालुक्यात वैभव नाईक (MLA Vaibhav Naik) यांच्या समर्थनार्थ मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी भाषण केले होते.
भाषणादरम्यान त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे, चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
(CM Eknath Shinde) यांच्यासह भाजपवर (BJP) टीका केली होती. त्यानंतर त्याच दिवशी मध्यरात्री त्यांच्या
घरावर हल्ला झाला होता.

Web Title :- MP Rajan Salvi | It is our position that we have to take it by the horns and if someone comes, Rajan Salvi’s warning.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा