MP Rajanitai Patil | मुंडे बहीण-भावाच्या वादात तिसऱ्याचा लाभ, भाजप-राष्ट्रवादीच्या चढाओढीत काँग्रेसने मारली बाजी

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – MP Rajanitai Patil | दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ अशी म्हण तुम्ही ऐकली असेल. याच म्हणीचा प्रत्यय बीड जिल्ह्यात (Beed district) आला आहे. मुंडे बहीण-भावाच्या भांडणात काँग्रेसने (Congress) बाजी मारली आहे. नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकांचा निकाल लागला आहे. नगरपंचायत निवडणुकांच्या निकालानंतर (Nagar Panchayat Election Result) काही ठिकाणी त्रिशंकु परिस्थिती निर्माण झाल्याने प्रत्येक पक्ष सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहे. अशीच परिस्थिती केज नगरपंचायतमध्ये (Kej Nagar Panchayat) निर्माण झाली आहे. याचाच फायदा घेत काँग्रेसच्या खासदार रजनीताई पाटील (MP Rajanitai Patil) यांनी बाजी मारत केज नगरपंचायतमध्ये जनविकास आघाडी (Janvikas Aghadi) सोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.  . (Congress join hands with Janvikas Aghadi in Kej Nagar Panchayat)

काँग्रेसच्या खासदार रजनीताई पाटील यांच्या या निर्णयामुळे पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना धक्का बसला असल्याची चर्चा सध्या केजमध्ये सुरु आहे. केज नगरपंचायतमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय राष्ट्रवादीचे (NCP) जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांनी प्रतिष्ठेसाठी वाटेल ते करुन सत्ता आणणार असा दावा केला होता. (MP Rajanitai Patil)

तर दुसरीकडे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी जनविकास आघाडी ही भाजप (BJP) पुरस्कृत आहे, केजमध्ये नगराध्यक्ष (Mayor) भाजपचा होणार असं जाहीर भाषणात म्हटलं होतं. या वक्तव्याला खुद्द जनविकास आघाडीचे प्रमुख हारुन इनामदार (Aaron Inamdar) यांनी विरोध दर्शवत कोणत्याही पक्षाची पुरस्कृत आघाडी नसून आमची केज शहर विकासाच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेली जनविकास आघाडी आहे. त्यामुळे भाजप पुरस्कृत आघाडी हा दावा चुकीचा असल्याचे इनामदार यांनी सांगितले.

स्थानिक राष्ट्रवादी ही गलिच्छ राजकारण करत आहे, केजच्या नागरिकांच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो असून खासदार रजनीताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा विकास करुन दाखवू असे काँग्रेसचे आदित्य पाटील (Aditya Patil) यांनी सांगितले. आम्ही जरी महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) एकत्र असलो तरी स्थानिक विषयाच्या अनुषंगाने आम्ही राष्ट्रवादीला दूर ठेवल्याचे पाटील यांनी म्हटले.

असे आहे पक्षीय बलाबल

जनविकास आघाडी -8
राष्ट्रवादी काँग्रेस – 5
काँग्रेस – 3
अपक्ष -1
एकूण – 17

Web Title : MP Rajanitai Patil | congress will form government in beed kej nagar panchayat
big jolt for bjp pankaja munde ncp dhananjay munde MP Rajanitai Patil

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Blood Sugar Range | मुले, प्रौढ आणि ज्येष्ठांची किती असावी ब्लड शुगर, पहा संपूर्ण चार्ट

 

Pune Police | पुणे पोलीस शहर दलातील 4 ‘अति’ वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘कोरोना’ची लक्षणे,
पदभार इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे

 

Omicron | ओमिक्रॉनच्या ‘या’ 4 लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, होऊ शकते मोठी समस्या