रामराजे हे बारामतीकरांचा ‘पट्टा’ गळ्यात बांधल्याप्रमाणे वागतात, आशांना ‘जोडे’ मारून हाकलून द्यावे : खा. रणजितसिंह निंबाळकर

माढा : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकांदरम्यान माढा लोकसभा मतदार संघ चर्चेत होता. आता निवडणुका झाल्यानंतरही हा मतदारसंघ तेथील पाणी प्रश्नामुळे चर्चेत आहे. नीरा देवघर धरणाच्या पाण्यावरून माढा, सातारा आणि बारामतीच राजकारण दिवसेंदिवस तापत आहे. यावर नेतेमंडळी आक्रमक झाली आहे. त्यात रामराजे निंबाळकर यांनी उदयनराजेंवर टीका केली होती. त्यावर खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी रामराजेंना उत्तर देत टीका केली आहे.

रामराजे निंबाळकर हे बारामतीकरांचा पट्टा गळ्यात बांधल्याप्रमाणे वागत आहेत. आपल्या जनतेचे बारामतीने नेलेले पाणी कसे पुन्हा अडवता येईल याचा प्रयत्न करीत आहेत. हे करताना ते छत्रपतींवरही टीका करत असून अशा माणसांना जोडे मारुन बाहेर हाकलून द्यावे लागेल, अशा शब्दात खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी रामराजे निंबाळकरांवर टीका केली आहे. छत्रपतींच्या घराण्यावर केलेली टीका रामराजेंना शोभते का? लोकांवर टीका करताना पिसाळलेली कुत्री म्हणतात, मग आपल्यावर टीका केल्यावर का चिढता, असा संत्पत सवालही त्यांनी यावेळी केला.

आपल्या वाटणीचे पाणी बारामतीकरांना देताना यांना लाज वाटली नाही. आता जेव्हा सरकारने दुष्काळी जनतेला त्यांच्या हक्काचे पाणी देत आहे त्यावेळी त्यात तांत्रिक त्रुटी काढून लोकांचं नुकसान कसे करता येईल, हायकोर्टात मुद्दे कसे उपस्थित करता येतील असे घृणास्पद प्रकार रामराजे करत आहेत. मी या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो.

अशा लोकांना रस्त्यावर जोडे मारले पाहिजते आणि अशा लोकांना मतदारसंघातून हाकलून लावले पाहिजे, असं रणजितसिंह निंबाळकरांनी यावेळी म्हटलं. तसंच आता हे पाणी बारामतीला जाणार नाही. इथल्याच शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळेल, असा निश्चय त्यांनी यावेळी केला.

दरम्यान, पाणी प्रश्नावर खासदार उदयनराजेंनी रामराजे निंबाळकरांवर अप्रत्यक्ष टीका केली होती. स्वतःच्या स्वार्थासाठी १४ वर्ष पाणी बारामतीला पळवलं. जमिनी लाटण्यासाठी काहींनी लोकांना पाण्यापासून दूर ठेवलं, असा गंभीर आरोप उदयनराजेंनी केला होता.

तसंच या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि गुन्हेगारांवर कारवाई झालीच पाहिजे, असंही उदयनराजेंनी म्हटलं होतं. त्यावर उदयनराजेंवर ३०२ चे गुन्हे दाखल आहेत. त्यांनी जरा छत्रपतींसारखं वागावं. सगळी संस्थानं खालसा झाली. संस्थानं खालसा झाल्यावर कुणी छत्रपती लावत का? आताचे छत्रपती हे स्वयंघोषित आहेत.

लोकं महाराज म्हणतात म्हणून आम्ही महाराज म्हणतो. ते छत्रपतींचे वंशज आहेत हे मान्य आहे, मात्र छत्रपती असल्यासारखं वागा. कमीत कमी सूर्याजी पिसाळासारखं वागू नका, एका बाजूला एक बोलायचं दुसऱ्या बाजूला एक बोलायचं, अशी टीका रामराजेंनी उदयनराजेंवर केली होती.

आरोग्य विषयक वृत्त –

म्हणून ३५ वयानंतर पुरुषांनी कराव्यात ‘या’ तपासण्या

जाणून घ्या ‘केमोथेरेपी’ म्हणजे नेमकं काय ?

जागतिक रक्तदान दिन : गरिबांचा कैवारी ‘अनिल लुणिया’

किहोल सर्जरी ‘ब्रेन ट्युमर’ काढण्यासाठी फायदेशीर

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like