MP Sambhajiraje Chhatrapati | ‘देवेंद्रजी आपण उद्या मुख्यमंत्री, पंतप्रधानही व्हाल; पण…’

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – MP Sambhajiraje Chhatrapati | ‘देवेंद्रजी तुम्ही आता विरोधी पक्षनेते आहात, उद्या मुख्यमंत्री व्हाल आणि भविष्यात पंतप्रधानही व्हाल. पण माझी एक अपेक्षा आहे की, शिवाजी महाराजांचे आचार विचार हे लिखित स्वरुपात सामान्यातल्या सामान्य शिवभक्तापर्यंत पोहोचला पाहिजे,’ अशी अपेक्षा भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती (MP Sambhajiraje Chhatrapati) यांनी व्यक्त केली आहे. या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

 

चाळीसगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), माजी मंत्री गिरीष महाजन (Girish Mahajan), खासदार रक्षाताई खडसे (MP Raksha Khadse) यांच्यासह खासदार संभाजीराजे छत्रपती (MP Sambhaji Raje Chhatrapati) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. याचवेळी संभाजीराजे यांनी फडणवीस यांच्याकडे याबाबत अपेक्षा व्यक्त केली आहे.

 

त्यावेळी बोलताना खा. संभाजीराजे म्हणाले, ‘देवेंद्रजी तुम्ही आता विरोधी पक्षनेते आहात, उद्या मुख्यमंत्री व्हाल आणि भविष्यात पंतप्रधानही व्हाल. पण माझी एक अपेक्षा आहे की, शिवाजी महाराजांचे आचारविचार हे लिखित स्वरुपात सामान्यातल्या सामान्य शिवभक्तापर्यंत पोहोचला पाहिजे. तर, राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी, परंतु, आता महाराष्ट्राची ओळख जपण्याची गरज आहे. त्यासाठी राज्यातील सर्व नेत्यांनी एकत्र येऊन आरक्षणाचा प्रश्न सोडवला पाहिजे,’ असं आवाहन संभाजीराजे (MP Sambhaji Raje Chhatrapati) यांनी केलं आहे.

‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण करण्याचे भाग्य लाभले याबाबत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आभार व्यक्त केले आहेत. ‘छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि ते खऱ्या अर्थाने युगपुरुष होते,’ असं फडणवीस यांनी यावेळी म्हटलं आहे.

 

Web Title :- MP Sambhajiraje Chhatrapati | MP sambhajiraje chhatrapati reaction bjp devendra fadnavis statement chalisgaon jalgaon

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Sharad Pawar | शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले – ‘…तर राज्यात भाजपा-राष्ट्रवादीचं सरकार आलं असतं, मात्र’

 

Gold Price Today | आज 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या दरात कमालीची घसरण, जाणून घ्या किती झाले स्वस्त

 

Pune Crime | पुण्यात 12 वर्षाच्या मुलीने दाखविली ‘बहादुरी’ ! बलात्कार करणार्‍याचा प्रयत्न करणार्‍याला घडविली ‘अद्दल’

 

Pune Crime | माजी गृह राज्यमंत्री आणि पुणे काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांना चोरट्यांचा ‘हिसका’ ! रिव्हॉल्व्हर पळविले