चटणी अन् भाकरी, रस्त्याच्या कडेलाच संभाजीराजेंनी घेतला जेवणाचा आस्वाद, पहा व्हिडिओ

पोलिसनामा ऑनलाईन – कार्यकर्त्याने घरातून आणून दिलेल्या जेवणाचा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी गाडीच्या बोनेटवर पत्रावळी ठेऊन आस्वाद घेतला. कांदा आणि चटणी भाकरीच्या चवीची सर दुसर्‍या कोणत्याही पदार्थाला नाही,’ असे म्हणत संभाजीराजेंनी व्हिडिओ शेअर केला आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर संभाजीराजे आरक्षणाच्या लढाईचे नेतृत्व करत आहेत. यानिमित्त ते राज्यातील विविध भागात होणार्‍या सकल मराठा समाजाच्या बैठकांनाही हजेरी लावत आहेत.

काल रायगड किल्ल्याच्या कामांची पाहणी करून खाली यायला दुपार उलटली होती. राजेंनी सकाळपासून काहीच खाल्ले नव्हते. रस्त्याच्या कडेला गाडी लावून जेवण करायला संध्याकाळचे साडेचार वाजले होते. त्यामुळे कार्यकर्त्याने दिलेले जेवण करून, पुन्हा मुंबईला महत्वाच्या बैठकी करीता निघालो आहे. कार्यकर्त्याने आणून दिलेल्या कांदा आणि चटणी भाकरीच्या चवीची सर दुसर्‍या कोणत्याही पदार्थाला नाही. असे म्हटल्याचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दिल्लीतून निघून, नाशिक मधील राज्यस्तरीय मराठा मराठा क्रांती मोर्चाची बैठक संपवून दुसर्‍या दिवशी रायगडला आलो. छत्रपती ना स्वतः पेक्षा समाज महत्वाचा असतो,’ अशी फेसबुक पोस्ट संभाजीराजे यांनी लिहिली आहे.