खासदार संभाजीराजे देणार पूरग्रस्तांसाठी देणार पाच कोटी रुपये

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अतिवृष्टीमुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील आपत्तीग्रस्तांना खासदार संभाजीराजे यांनी पाच कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. खासदार कोटयातून ही मदत करणार असल्याची माहिती त्यांनी ट्विटरवर नुकतीच दिली.

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील आपत्तीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे प्रशासनासह राज्यभरातून अनेक सामाजिक संस्था, सामान्य नागरिक आपापल्या परीने मदत करत आहेत. महापुराने वेढलेल्या क्षेत्रासाठी संभाजीराजे आपत्तीग्रस्तांच्या पुर्नवसनासाठी पाच कोटी रुपयांची मदत करणार आहेत. कोल्हापुरातील पंचगंगा आणि सांगलीतील कृष्णा नदीला पुर आल्याने तेथील नागरिकांचे हाल होत आहेत. दैंनदिन जीवनावश्यक वस्तूंचाही तुटवडा भासत आहेत. आर्थिक मदतीशिवाय त्यांनी स्वतः त्या भागात जाऊन मदतही केली. बचाव पथक निश्चित ठिकाणी पोहचण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला आहे. या परिस्थितीत संभाजीराजेनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपत्तीग्रस्तांसाठी त्यांच कार्यालय २४ तास खुले ठेवले होते. गरजेच्या वेळी जाहीर केलेल्या क्रमांकावर त्यांनी फोन करण्याच आवाहन केल आहे.

आरोग्यविषयक वृत्त –