भाजप विरोधात बोलण्यासाठी राज ठाकरेंना थेट विधानसभेच्या ‘इतक्या’ जागेंची ऑफर : खा. संजय काकडे

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात सभा घेण्यासाठी सुपारी दिली आहे. आणि ती सुपारी जमिनी किंवा पैशांच्या रूपात नाही तर विधानसभेच्या २५ जागेची ती सुपारी आहे. असा घणाघाती आरोप भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु आहे. निवडणुकीच्या दोन टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. येत्या २३ एप्रिलला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. याचदरम्यान, भाजप अध्यक्ष अमित शहा यांची पुण्यातील  महायुतीच्या उमेदवारांसाठी भिगवणमध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी अमित भाई या विरोधकांना इतका धसका बसला आहे. यांनी भाड्याने आणि सुपारी देणे सुरु केले आहे. आणि यातच एक राज ठाकरे नावाची व्यक्ती आहे. आता त्याला सुपारी दिली आहे. आणि ती सुपारी म्हणजे पैसे किंवा जमीन देण्यावर नाही तर त्यांनी एक नवीन सुपारी दिली आहे. ते म्हणजे विधानसभेची सुपारी, असे संजय काकडे यांनी म्हटले. याचबरोबर आम्ही तुझे २५ सभासद विधानसभेवर पाठवू, तुझ्यासोबत युती करू, तुला विधानसभेच्या २५-३० जागा देऊ, असे आमिष राष्ट्रवादी काँग्रेसने राज ठाकरेंना दाखवून ही नवीन सुपारी दिली आहे, असेही त्यांनी म्हटले.

इतेकच नव्हे तर,  ज्याचा एकही खासदार नाही, एकही आमदार नाही. असा व्यक्ती आपल्या मोदीसाहेबांबद्दल, अमित शाहांबद्दल नाही ते वायफळ बोलतो. ज्यांच्याकडे मुंबईत एक नगरसेवक, पुण्यात दोन नगरसेवक, नाशिकला चार नगरसेवक आहेत. ज्यांना स्वत: चे उमेदवार निवडून आणता आले नाहीत. ते आपले उमेदवार काय पाडणार. असा टोलाही त्यांनी राज ठाकरेंना लगावला.

Loading...
You might also like