MP Sanjay Patil | ‘मी भाजपचा खासदार, म्हणून ED इकडं येणार नाही’, हर्षवर्धन पाटलांनंतर ‘या’ पाटलांचे वक्तव्य

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपकडून (BJP) केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) वारंवार केला जात आहे. तर भाजपकडून आरोपांचे खंडन केले जात आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी केलेल्या विधानाची चर्चा रंगली होती. त्यानंतर आता भाजप खासदार संजय पाटील (MP Sanjay Patil) यांचाही असाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये ईडीसंदर्भात (ED) विधान करताना खासदार संजय पाटील (MP Sanjay Patil) यांनी आपण भाजपचे खासदार असल्याचे म्हटले आहे.

सांगली (Sangli) जिल्ह्यातील तासगावमधील एका मॉलच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना खासदार संजय पाटील (MP Sanjay Patil) यांनी ईडीसंदर्भात भाष्य केले आहे. आपल्या भाषणात गमतीशीरपणे ते सांगत असताना, त्यांनी भाजप नते हर्षवर्धन पाटील यांचा उल्लेख केला. वैभवदादा मी भाजपचा खासदार आहे, त्यामुळे ईडी काय एवढ्यात इकडं येणार नाही, असे पाटील यांनी म्हटले आहे. पाटील यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (social media) प्रचंड व्हायरल (Viral) होत आहे.

पाटील पुढे म्हणाले, आम्ही गाडी वापरताना बँकेचं कर्ज काढून 40 लाखाची गाडी घेणार,
पण लोकांपुढे ते जास्त दिसतं. ईडीनं आमची कर्ज बघितली तर, ते म्हणतील ही माणसं आहेत की काय,
एवढी आमची कर्ज आहेत. हर्षवर्धन पाटील यांनी गंमती गंमतीत म्हटलं होतं की, भाजपमध्ये आल्यापासून झोप चांगली लागतेय,
अशी आठवण खासदार पाटील यांनी करुन दिली.
त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने आता पुन्हा एकदा भाजप आणि ईडीची चर्चा रंगली आहे.

Web Title :- MP Sanjay Patil | sangli mp sanjay patil goes viral i am bjp mp so ed will not come here

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | पुणे महापालिकेवर पूर्वीप्रमाणे काँग्रेसचा झेंडा फडकवा – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

Pune Corona | दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 103 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Nawab Malik | राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिकांचा समीर वानखेडेंवर पुन्हा गंभीर आरोप, मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी