MP Sanjay Raut | अनिल देशमुखांच्या ईडी चौकशीवर संजय राऊत म्हणाले – ‘आम्ही बघून घेऊ’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MP Sanjay Raut |सक्तवसुली संचलनालयानं (ED ) शुक्रवारी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) यांच्या मुंबई  (Mumbai) आणि नागपूर (Nagpur) येथील निवासस्थानी छापे टाकले. ९ तासाहून अधिक काळ चौकशी करत रात्री उशिरा अनिल देशमुख यांच्या स्वीयसहाय्यक (Self-Assistant) आणि खासगी सचिवां (Private Secretary) ना अटक (Arrest) केली आहे. दरम्यान अनिल देशमुख यांना आज सकाळी चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स (Summons) बजावण्यात आले आहेत. या कारवाईबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत ( Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी भाजप (BJP) वर सडकून टीका केली. केंद्रीय तपास यंत्रणां ( Central Investigation Agency) चा वापर करून त्रास देणे हे काही नवीन नाही, पण आम्ही बघून घेऊ अशा शब्दात राऊत यांनी भाजपवर हल्लबोल केला.

मुंबईतील प्रसारमाध्यमाशी बोलताना संजय राऊत म्हणाले, केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून दिल्या जाणाऱ्या त्रासाबाबत गुरुवारी शरद पवार (Sharad Pawar) बोलले आहेत. आमदार राष्ट्रवादीचे असो किंवा शिवसेनेचे सर्वांना विनाकारण त्रास दिला जात आहे. पण महाविकास आघाडी भक्कम आहे. आम्ही बघून घेऊ असा इशारा त्यांनी दिला.

 

काँग्रेसशिवाय तिसरी आघाडी शक्यच नाही

भाजपला पर्याय आघाडी उभी करण्याची आवश्यकता आहे.
त्यासाठी काँग्रेसला सोबत घेतल्याशिवाय कोणतीही आघाडी पूर्ण होऊ शकत नाही असे मी यापूर्वीही म्हंटले होते.
शरद पवार यांनीही आता तीच भावना व्यक्त केली आहे.
कारण देशातील मोठा पक्ष काँग्रेस आहे.
भाजपाला आव्हान निर्माण करायचं असेल तर काँग्रेसला सोबत घेऊनच आघाडी तयार होऊ शकेल असं संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : mp sanjay rajut | shivsena mp sanjay raut attacks bjp over ed inquiry anil deshmukh says we will saw

हे देखील वाचा

ICC T20 World Cup । आयपीएल- 2021 नंतर आता ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचीही तारीख जाहीर, ‘या’ ठिकाणी होऊ शकतात सामने

TATA Group | ‘टाटा’ ग्रुपच्या ‘ताज’नं केली जगातील मातब्बर कंपन्यांवर मात

Pune News | पुण्यात भाजपच्या चक्काजाम आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद; घोषणाबाजीनं कात्रज परिसर दणाणला, माजी मंत्री पंकजा मुंडेंची उपस्थिती