MP Sanjay Raut | संजय राऊतांच्या अडचणी वाढणार? ‘त्या’ प्रकरणात राऊतांवर गुन्हा दाखल

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. संजय राऊत यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहर पोलीस ठाण्यात (Barshi City Police Station) संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन अत्याचार पीडित मुलीची (Minor Girl Rape Case) ओळख जाहीर केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पॉक्सो कलम 23 (POCSO Act), ज्युनेनाईल जस्टिस अॅक्ट (Juvenile Justice Act) कलम 74 आणि आयपीसी 228 (A) नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीवर दोन जणांनी अत्याचार केले होते. याबाबत मुलीने पोलिसांकडे तक्रार दिल्याचा राग मनात धरुन आरोपींनी घरात घुसून तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात पीडित मुलगी गंभीर जखमी झाली. त्यानंतर पोलिसांनी अक्षय माने व नामदेव दळवी या दोन आरोपींना अटक केली. मात्र, यासदंर्भात ट्विट करताना या घटनेतील पीडित मुलीचा फोटो संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी ट्विट केला होता. पीडिता ही अल्पवयीन होती, आणि या पोटोद्वारे तिची ओळख पटत असल्याने राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय राऊत काय म्हणाले होते?

मुलीचा फोटो ट्विट करताना संजय राऊत म्हणाले, देवेंद्रजी, हे चित्र बार्शीतील आहे. मुलगी तुमच्या कुटुंबातील नाही म्हणून तिचे रक्त वाया जाऊ देऊ नका. भाजप (BJP) पुरस्कृत गुंडांनी हा जीवघेणा हल्ला केला आहे. अल्पवयीन मुलगी पारधी समाजाची आहे, गरिबांच्या मुली रस्त्यावर पडल्या आहेत का? 5 मार्चला हल्ला झाला, आरोपी मोकाट आहेत, असे राऊत यांनी म्हटले.

चित्रा वाघ यांची राऊतांवर टीका

दरम्यान, संजय राऊत यांच्या ट्विटनंतर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (BJP Leader Chitra Wagh) यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. या प्रकरणात दोन्ही आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करत अटक झाली. आताही आरोपी जेलमध्ये आहेत ही वस्तुस्थिती असताना का तुम्ही खोटी माहिती देताय? सगळ्यात महत्वाचं तुम्ही पीडितेचा फोटो कसा काय व्हायरल केलात? असा सवाल करत संजय राऊतांवर कारवाई करण्याची मागणी चित्रा वाघ यांनी केली होती.

Web Title : MP Sanjay Raut | case has been registered against sanjay raut for tweeting the victim girls photo

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | संजय गायकवाडांच्या शासकीय कर्मचाऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरुन अजित पवार संतप्त, म्हणाले- ‘…तर राज्य चालवणं कठीण होईल’ (व्हिडिओ)

Popatrao Gawade | राष्ट्रवादीचे माजी आमदार, शरद पवारांचे निकटवर्तीय पोपटराव गावडे रूबी हॉलमध्ये दाखल, उपचार सुरू

Pune Crime Suicide News | भाजप नेत्याच्या सॉफ्टवेअर इंजिनिअर मुलीची पुण्यात आत्महत्या