MP Sanjay Raut | देवेंद्रजी, गरिबांच्या मुली रस्त्यावर पडल्या आहेत का?, संजय राऊतांनी बार्शीमधील ‘त्या’ पीडित मुलीचा फोटो केला शेअर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सोलापूर जिल्ह्यातील (Solapur District) बार्शी तालुक्यात (Barshi Taluka) एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार (Minor Girl Rape Case) करण्यात आले. त्यानंतर पीडित मुलीने पोलिसांकडे तक्रार दिल्याच्या रागातून आरोपींनी मुलीवर तिच्या घरात घुसून वार केले. ही गंभीर घटना 6 मार्च रोजी घडली होती. पीडित मुलीने 5 मार्चला आरोपींविरुद्ध तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल केला मात्र आरोपींना अटक (Arrest) करण्यात टाळाटाळ केली होती. हे प्रकरणी आमदार सचिन अहेर (MLA Sachin Aher) यांनी विधानपरिषदेत उपस्थित केल्यानंतर आता खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना सवाल केला आहे. तसेच संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी पीडित मुलीचा रक्तबंबाळ अवस्थेतील फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.

मुलीचा फोटो ट्विट करताना संजय राऊत (MP Sanjay Raut) म्हणाले, देवेंद्रजी, हे चित्र बार्शीतील आहे. मुलगी तुमच्या कुटुंबातील नाही म्हणून तिचे रक्त वाया जाऊ देऊ नका. भाजप (BJP) पुरस्कृत गुंडांनी हा जीवघेणा हल्ला केला आहे. अल्पवयीन मुलगी पारधी समाजाची आहे, गरिबांच्या मुली रस्त्यावर पडल्या आहेत का? 5 मार्चला हल्ला झाला, आरोपी मोकाट आहेत, असे राऊत यांनी म्हटले.

दरम्यान, अमृता फडणवीस यांना लाच देऊ केल्याप्रकरणी (Amruta Fadnavis Bribery Case) आरोपी मुलीवर गुन्हा (FIR) दाखल करुन तिला अटक करण्यात आली आहे. यावरुन कारवाई होत असताना संजय राऊत यांनी बार्शीत मुलीसोबत घेडलेल्या प्रकाराबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.

काय आहे प्रकरण?

अल्पवयीन मुलीवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना 6 मार्च रोजी रात्री आठच्या सुमारास घडली होती. पीडित तरुणी ही अल्पवयीन असून तिच्यावर 5 मार्च रोजी दोघांनी अत्याचार केले होते. त्यानंतर मुलीने दोघांविरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यात (Barshi City Police Station) तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी दोघांविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

दुसऱ्या दिवशी या गुन्ह्याच्या तपास कमाच्या अनुषंगाने पीडित मुलीचे आई-वडील पोलीस ठाण्यात गेले होते.
त्यावेळी पीडित मुलगी घरात एकटीच होती. त्यावेळी संशयित आरोपी अक्षय माने आणि सिद्धेशवर दळवी हे
मुलीच्या घरी आले. त्यांनी सत्तूर आणि कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात मुलीच्या डोक्याला आणि
कपाळाला दुखापत झाली. तसेच हल्ल्यात तिच्या उजव्या हाताची दोन बोटे तुटली.

हल्ल्यात बेशुद्ध झालेल्या पीडित तरुणीला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या प्रकारानंतर आरोपी माने आणि दळवी याच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला.
या घटनेत संशयित आरोपींना तातडीने अटक न केल्यामुळे पोलीस ठाण्यातील चार जणांना तडकाफडकी
निलंबित करण्यात आले आहे.

पीडित मुलीने तक्रार दिल्यानंतर आरोपींना तातडीने अटक (Arrest) न केल्याने बार्शी शहर पोलीस ठाण्यातील
चार जणांना कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी
(Kolhapur Zone Special Inspector General of Police Sunil Phulari) यांनी निलंबित केले आहे.

सहायक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे (API Maharudra Parjane), पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र मंगरुळे
(PSI Rajendra Mangarule), महिला पोलीस उपनिरीक्षक सारिका गुटकुल (PSI Sarika Gutkul),
हेड कॉन्स्टेबल अरुण भगवान माळी (Arun Bhagwan Mali) अशी निलंबित (API, PSI Suspended) केलेल्या पोलिसांची नावे आहेत.

Web Title :-  MP Sanjay Raut | devendraji are the daughters of the poor lying on the streets sanjay raut shared the photo itself

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune ACB Trap | पोलिस निरीक्षकाकरिता 3 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणारा निघाला आमदाराचा चुलत भाऊ, युवक काँग्रेसचा प्रदेश महासचिव अ‍ॅन्टी करप्शनच्या ‘जाळयात’

Maharashtra Politics | ’48 जागा लढवायला आम्ही काय मूर्ख आहोत का? शिवसेना 125 ते 130 जागा लढवणार’, शिंदे गटाच्या आमदारांनी बावनकुळेंना सुनावले खडेबोल