MP Sanjay Raut | स्वाभिमान म्हणत भाजपसोबत गेले, आता कुठे गेला तुमचा स्वाभिमान?, संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंना सवाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) आणि भाजपचे (BJP) राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. त्यांच्या या विधानाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.

 

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत (MP Sanjay Raut) म्हणाले, छत्रपतींनी जर माफी मागितली तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येऊन शिवरायांचा जयजयकार का करतात? भारतीय नौदलाला (Indian Navy) त्यांनी जे काय नवीन बोधचिन्ह दिलय, शिवाजी महाराजांच्या नौसेनेचं ते काशासाठी दिलं? औरंगजेबाच्या आणि अफजलखानाच्या कबरी तोडण्याचे नाटक कशासाठी करत आहात? असे प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केले आहेत.

 

यावेळी राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि 40 आमदारांवर (Shinde Group MLA) टीका केली. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शिवसेना (Shivsena) फोडली, ते स्वाभिमानाचं तुणतुणं वाजवत, स्वाभिमान… स्वाभिमान म्हणत भाजपसोबत गेले ना, मग आता कुठे गेला तुमचा स्वाभिमान? राज्यपाल आणि भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांनी राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर शिवाजी महाराजांचा अपमान करुन 72 तास झाले. तरीही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि त्यांचे 40 लोक यावर साधा निषेधही करु शकले नाहीत. इतके तुम्ही घाबरत आहात? असा टोला राऊत यांनी लगावला.

 

शिवजा माहाराजांच्या या अपमानावर तुम्ही सरकारमधून राजीनामा (Resignation) दिला पाहिजे होता, कारण भाजपने शिवाजी महाराजांचा केलेला हा अपमान आहे. मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्र्यांनी या अपमानानंतर ताबडतोब राजीनामा देयला हवा होता, असेही संजय राऊत म्हणाले.

 

काय म्हणाले सुधांशु त्रिवेदी ?

एका हिंदी वृत्तवाहिनीच्या चर्चासत्रात बोलताना भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी म्हणाले,
सावरकरांनी (Swatantryaveer Savarkar) ब्रिटीशांची माफी मागितली होती,
असं सांगण्याचा प्रयत्न राहुल गांधींनी (Congress MP Rahul Gandhi) केला.
त्या काळात अनेक लोक प्रस्तावित फॉरमॅटमधून (Prescribed Format)
बाहेर निघण्यासाठी माफी मागत होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी देखील पाचवेळा औरंगजेबाला पत्र लिहिलं होतं.
मग याचा अर्थ काय झाला? पण सावरकरांनी ब्रिटिश संविधानाची (British Constitution) शपथ तरी घेतली नव्हती, असं वक्तव्य त्रिवेदी यांनी केले आहे.

 

 

Web Title :- MP Sanjay Raut | if chhatrapati apologized then why does pm modi come
to maharashtra and chant shivaji maharaj sanjay rautas statement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा