MP Sanjay Raut | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी 14 फेब्रुवारी रोजी, संजय राऊत म्हणाले – ‘व्हलेंटाईन डे प्रेमाचा दिवस, सर्व काही…’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शिवसेनेत फूट आणि राज्यातील सत्तासंघर्षासंदर्भात (Maharashtra Politics Issue) मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होणार होती. परंतु सत्तासंघर्षाचा पेच आणखी लांबवणीवर पडला आहे. या प्रकरणाची पुढची सुनावणी 14 फेब्रुवारीला होईल, अशी माहिती मुख्य न्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड (Chief Justice D.Y. Chandrachud) यांनी दिली. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली. 14 फेब्रुवारीचा दिवस व्हॅलेंटाईन दिवस आहे. सर्व काही प्रेमाने होईल, अशी मिश्कील टिप्पणी संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केली. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.

काय म्हणाले संजय राऊत?

आमचं घटनेवर प्रेम आहे. 14 फेब्रुवारीपासून घटनापीठ (Constitution Bench) सलग सुनावणी घेणार आहे. ही आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आज मुख्य न्यायाधीशांनी सांगितले की, आम्ही महाराष्ट्राचा प्रकरणावर 14 फेब्रुवारीपासून सुनावणी घेऊ. 14 फेब्रुवारीचा दिवस व्हॅलेंटाईन दिवस (Valentine’s Day) आहे. सर्व काही प्रेमाने होईल, असे संजय राऊत (MP Sanjay Raut) म्हणाले.

यावेळी खासदार अनिल देसाई (MP Anil Desai) देखील उपस्थित होते. ते म्हणाले, ही सुनावणी सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे जाणार की नाही, याबाबत निश्चित सांगता येणार नाही. परंतु 14 फेब्रुवारीपासून यासंदर्भात सलग सुनावणी होणार आहे. ही सुनावणी सात न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे होते की पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे होते हे बघावे लागेल, असे अनिल देसाई म्हणाले.

न्यायालयात काय झाले?

ठाकरे गटाने (Thackeray Group) हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे द्या, अशी मागणी केली.
यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे पीठासीन अधिकाऱ्यांविरोधात अविश्वास प्रस्ताव प्रलंबित असेल तर
त्यांना कारवाईचा अधिकार आहे की नाही हा या सगळ्या प्रकरणातील कळीचा मुद्दा आहे.
2016 मध्ये अरुणाचल प्रदेशातील नबाम रेबिया केसमध्ये (Nabam Rabies Case) सुप्रीम कोर्टाच्या
पाच न्यायमूर्तींच्या पीठानं महत्त्वाचा निकाल दिला आहे.
अविश्वास प्रस्ताव प्रलंबित असताना पीठासीन अध्याक्षांना कारवाईचा अधिकार नाही,
असं या निकालात नमूद केलं आहे. शिंदे गटाने याच निकालाचा आधार घेत, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ
(Narhari Zirwal) यांना अपात्रतेबाबत कारवाईचा अधिकार नाही, असे म्हटलेय.
त्यानंतर न्यायाधीशांनी सॉलिसिटर जनरल आणि शिंदे गटाचे वकील हरिश साळवे (Adv. Harish Salve)
यांचे मत घेऊन ही सुनावणी 14 फेब्रुवारी रोजी होणार असल्याचे म्हटले.

Web Title :- MP Sanjay Raut | maharashtra politics crisis next hearing on february 14 sanjay raut said everything will be done with love

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut | ‘हे जिवंत सरकार नाही’; संजय राऊतांचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल…

MP Sanjay Raut | ‘धर्मवीर’ चित्रपटावरुन संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला, म्हणाले – ‘हा चित्रपट…’

Maharashtra Politics Issue | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी पुढे ढकलली, पुढील सुनावणी 14 फेब्रुवारी रोजी