MP Sanjay Raut | ‘यापुढे आम्ही आमच्या भूमीका ठरवू’, संजय राऊतांचा मित्रपक्षांना सूचक इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे (Nashik MLC Election) महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) विसंवाद असल्याचे पहायला मिळत आहे. काँग्रेसमध्ये बंडखोरी (Rebellion in Congress) झाल्यानंतर त्याठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार कोण? असा प्रश्न निर्माण झाला. तर शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे न घेता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे पाठिंबा मागितला. शिवसेनेने शुभांगी पाटील यांना अखेरच्या क्षणी पाठिंबा दिल्याने त्या महाविकीस आघाडीच्या उमेदवार असल्याचे जाहीर करण्यात आले. या सर्व गोंधळावरून खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी मित्रपक्षांना सूचक इशारा दिला आहे. आम्ही त्याग करत आलो. पण यापुढे असं होणार नाही. यापुढे आम्ही आमच्या भूमिका ठरवू असे संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी म्हटले आहे.

 

संजय राऊत (MP Sanjay Raut) म्हणाले, शुभांगी पाटील यांनी काल उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेचा (Shiv Sena) पाठिंबा मागितला. आम्ही त्यांना पाठिंबा दिला, कारण त्यांची तयारी आम्ही पाहिली आणि आम्हाला असं वाटलं की त्या चांगल्या प्रकारे पुढे जातील. यासंदर्भात आम्ही काँग्रेस व राष्ट्रवादीला (NCP) सूचना केली आहे आणि त्या योग्य उमेदवार (Maharashtra Election) आहेत. आज उद्धव ठाकरे यांनी उत्तर महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पादाधिकाऱ्यांना यासंदर्भात सूचना दिल्या आहेत, की सर्वांनी शुभांगी पाटील यांच्या मागे उभे राहायचं आहे.

 

यापुढे असं होणार नाही
एकत्र बसून नक्कीच सुरुवातीला चर्चा झाली होती. त्यानुसार नागपूर शिवसेनेसाठी सोडलं होतं.
मात्र अखेरच्या वेळी त्याग करण्याची जबाबदारी ही शिवसेनेवरच असते आणि विरोधकांचं ऐक्य वगैरे
या महान शब्दांना महत्त्व देऊन आम्ही हा त्याग करत आलो. मात्र यापुढे असं होणार नाही.
यापुढे आम्ही आमच्या भूमिका ठरवू, अशा शब्दांत संजय राऊतांनी मित्रपक्षांना सूचक इशारा दिला.

निर्णय घ्यायचा असेल तर…
नागपूर शिक्षक मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार होते. आम्ही त्यांची उमेदवारी मागे घेतली.
कारण महाविकास आघाडीच्या संदर्भात जर निर्णय घ्यायचा असेल तर सगळ्यांनी एकत्रित लढलं पाहिजे.
म्हणून आम्ही त्या ठिकाणची उमेदवारी मागे घेतली आणि आडबोले यांच्या मागे उभे राहण्याचा निर्णय घेतला.
याबाबत आज सकाळी नाना पटोले (Nana Patole) आणि उद्धव ठाकरे यांच्या चर्चा झाली.
तसेच शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाले. यातून हे सगळे निर्णय घेतल्याचे राऊत यांनी सांगितले.

 

Advt.

Web Title :- MP Sanjay Raut | nashik graduate constituency elections disturbance was observed regarding the candidate of mahavikas aghadi sanjay raut

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime News | खाणीत पडून 21 वर्षीय तरुणीच्या मृत्यू प्रकरणातील आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

Nashik Graduate Constituency Election | नॉट रिचेबल असलेल्या शुभांगी पाटील माध्यमांसमोर येताच म्हणाल्या…

Kirit Somaiya | हसन मुश्रीफ यांच्याबाबतची ‘ती’ भूमिका चंद्रकांतदादा पाटील यांनीच स्पष्ट करावी – किरीट सोमय्या