MP Sanjay Raut | संजय राऊतांच्या अडचणी वाढणार! ‘त्या’ आवाहनावरुन नाशिक पोलिसांकडून गुन्हा दाखल

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. संजय राऊत यांनी शनिवारी (दि.13) शासकीय विश्रामगृहावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत एक आवाहन केले होते. राज्यातील सरकार (State Government) बेकायदेशीर असल्याने पोलीस आणि इतर अधिकाऱ्यांनी त्यांच्या आदेशाचे पालन करु नये. यावरुन आता नाशिक पोलिसांनी (Nashik Police) संजय राऊतांवर (MP Sanjay Raut) गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी शनिवारी नाशिकच्या शासकीय विश्रामगृहावर (Government Rest House) पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिलेल्या निकालावर भाष्य केलं. त्यांनी राज्यातील सरकार हे अपात्र आमदारांच्या भरवशावर असल्याने ते बेकायदेशीर आहे. सर्वोच्च न्यायालयाने ते बेकायदेशीरच ठरवले आहे. त्यामुळे अशा घटनाबाह्य आणि बेकायदेशीर सरकारच्या आदेशांचे पालन करु नये, असे आवाहन राऊत यांनी केले होते. त्या अनुषंगाने नाशिक पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निर्णय दिला आहे. यानंतर राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. याच दरम्यान संजय राऊत यांनी सरकार विरोधात वक्तव्य केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. राऊतांवर कलम 505 अंतर्गत मुंबई नाका पोलीस ठाण्यात (Mumbai Naka Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title :- MP Sanjay Raut | nashik-police-has-registered-a-case-against-shivsena ubt-group-mp-sanjay-raut
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
pune University News | पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राम ताकवले यांचे निधन