MP Sanjay Raut | ‘तुम्ही कोल्हापूर सोडून कोथरुडला आला, आम्ही काही बोललो का? राऊतांचा पलटवार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – MP Sanjay Raut | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी एक आव्हान करत ‘एकदा संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी मुंबई महापालिकेत (BMC) एक सेफ जागा निवडणूक (Election) लढून जिंकून येऊन दाखवावं, असं म्हटलं होतं चंद्रकांत पाटलांच्या या प्रश्नाला आता शिवसेना नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. तुम्ही कोल्हापूर (Kolhapur) सोडून कोथरुडला (Kothrud) आला, आम्ही काही बोललो का?, अशा शब्दात टोला संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे.

संजय राऊत बोलताना म्हणाले की, ‘मी काय करावं हा प्रश्न येतो कुठे? त्यांनी त्यांचं पाहावं. माझ्याकडून त्रास होत आहे मान्य आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी पाटील यांच्यावर खोचक टिपणी केली आहे. माझ्या पक्षाने मला जी जबाबदारी दिली तिकडे मी असणार आणि ती जबाबदारी नेटाने पार पाडणार, आहे असे ते म्हणाले. दरम्यान, तुम्ही विधानसभा निवडणुकीला कोल्हापूर सोडून कोथरुडला आले. आम्ही तुम्हाला काही बोललो का? असं प्रत्युत्तर संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी दिलं आहे.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राऊतांना निवडणूक लढण्याचं चॅलेंज दिलं आहे. जर एकदा संजय राऊत यांनी मुंबई महापालिकेत एक सेफ जागा निवडणूक लढून जिंकून येऊन दाखवावे त्यांनी त्यांचे दंड ही थोपटून पहावे आणि ताकद ही पाहावी, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं.

Web Title :- MP sanjay raut reaction on to chandrakant patil bmc election challenge

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Money | जर तुमच्याकडे सुद्धा आहे Airtel चे सिम तर मिळेल 4 लाख रुपयांचा फायदा, जाणून घ्या कसा?

SSY | ‘या’ बँकेची विशेष ऑफर ! 250 रुपयात उघडा हे खाते, थेट 15 लाखाचा होईल फायदा, जाणून घ्या कसे?

EPFO | 6.5 कोटी नोकरदारांसाठी खुशखबर ! यावेळी PF खात्यात येतील जास्त पैसे, EPFO ने दिली ही महत्वाची माहिती