MP Sanjay Raut | अजित पवारांबद्दल केलेल्या ‘त्या’ विधानावर संजय राऊतांची दिलगरी, म्हणाले- ‘मला खेद वाटतो, मी असे…’

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – अजित पवारांबद्दल (Ajit Pawar) मला अर्धवट आणि वेगळा प्रश्न पत्रकारांनी विचारला होता. त्यावर मी कडक शब्दात उत्तर दिले, त्याचा मला खेद वाटतो, मी असे बोलायला नको होते असं सांगत खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी खुलासा केला आहे. धरणात मुतण्यापेक्षा थुंकलेले बरे असं विधान राऊत यांनी अजित पवारांबाबत केले होते. त्यावरुन आज संजय राऊतांनी (MP Sanjay Raut) दिलगिरी व्यक्त केली आहे.
संजय राऊत (MP Sanjay Raut) म्हणाले, अजित पवार यांच्याबद्दल मला अर्धवट माहितीवर प्रश्न विचारण्यात आला. अजित पवार आणि माझा स्वभाव एक सारखा आहे. लगेच रिएक्ट होतो. महाराष्ट्रात संयामाने वागले पाहिजे, बोलले पाहिजे असं अजित पवार म्हणाले. त्यापुढे संजय राऊतांनी खुलासा केला. त्यांची जीभ दाताखाली आली म्हणून ते थुंकले असा खुलासा त्यांनी केला. मात्र पत्रकारांनी अर्धवट महितीच्या आधारावर मला प्रश्न विचारला. त्यामुळे माझ्याकडून काही कडक शब्दात उत्तर दिले गेले. त्याचा मला खेद वाटतो, मी असे बोलायला नको होते, असं म्हणत संजय राऊत यांनी दिलगिरी व्यक्त केली.
संजय राऊत पुढे म्हणाले, आम्ही सगळे सहकारी आहोत. पवार कुटुंबाशी माझे स्नेहाचे संबंध आहेत. अजित पवार हे महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) प्रमुख नेते आहेत. जोपर्यंत संपूर्ण माहिती घेत नाही तोपर्यंत मी बोलणार नाही हे मी ठरवले आहे, असंही संजय राऊत यांनी सांगितले.
काय म्हणाले होते संजय राऊत?
संजय राऊतांनी किंवा कुणीही बोलताना संयम राखला पाहिजे, असे अजित पवार यांनी संजय राऊतांच्या कृतीवर प्रतिक्रिया दिली होती. यावर राऊतांना विचारले असता ते म्हणाले, धरणांमध्ये मुतण्यापेक्षा थुंकणं चांगलं, असं म्हणत राऊतांनी पवारांना प्रत्युत्तर दिले आहे. तसेच ज्याचं जळतं त्याला कळतं असही राऊत म्हणाले. आम्ही भोगतो आहोत. आम्ही सगळं भोगूनही जमिनीवर उभे आहोत. मी माझ्या पक्षासोबत उभा आहे. आमच्या मनात पक्ष बदलण्याचा आणि संकटं येत आहेत म्हणून भाजपसारख्या (BJP) पक्षाबरोबर सूत जुळवण्याचा आमचा विचार होत नाही, असंही राऊत म्हणाले.
अजित पवारांनी नेमकं काय म्हटलं होतं?
आपली काही संस्कृती, परंपरा आहे, इतिहास आहे. आपल्याला सगळ्यांनी यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan)
साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्र कसं काम करु शकतो याबाबत दाखवून दिले आहे, असं अजित पवार म्हणाले होते.
तसेच संजय राऊतांची दुसरी बाजू ऐकायला मिळाली की त्यांना कसलातरी त्रास होतोय.
मात्र, प्रत्येकाने तारतम्य ठेवून बोलावं, असं अजित पवार शनिवारी (दि.2) म्हणाले होते.
Web Title : MP Sanjay Raut | sanjay raut apologizes for criticizing ajit pawar targets bjp shivsena
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Lokesh Chandra IAS | लोकेश चंद्र यांनी महावितरणच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदाची सूत्रे स्वीकारली
- Pune Crime News | फरासखाना पोलिस स्टेशन : पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन धावत्या ट्रेनमधून गुन्हेगार पसार; हावडा दुरंतो एक्सप्रेसमधील घटना
- Pune Crime News | मायकार अॅपवरून कार भाड्याने घेऊन फरार झालेल्या आरोपींना विमानतळ पोलिसांकडून अटक