MP Sanjay Raut | ‘सत्यमेव जयते! टायगर इज बॅक’, संजय राऊतांच्या सुटकेनंतर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया, जणून घ्या कोण काय म्हणाले?

0
541
MP Sanjay Raut | sanjay raut bail maharashtra political leaders first reaction after granted bail on patra chawl land scam case
file photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांची 102 दिवसानंतर जामीनावर सुटका होणार आहे.पत्राचाळ घोटाळाप्रकरणी (Goregaon Patrachal Scam) संजय राऊत ईडी (ED) अर्थात सक्तवसुली संचालनालयाने (Enforcement Directorate) अटक केली होती. तेव्हापासून ते न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) होते. दरम्यानच्या काळात संजय राऊतांकडून अनेकवेळा जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र, प्रत्येक वेळी पीएमएलए कोर्टाने (PMLA Court) राऊतांचा (MP Sanjay Raut) अर्ज फेटाळून लावला होता. अखेर आज न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर (Bail Granted) केला आहे. संजय राऊत यांना जामिन मंजूर झाल्यानंतर विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत डरपोक नाहीत – आदित्य ठाकरे

संजय राऊत (MP Sanjay Raut) यांना जामीन मिळाल्यानंतर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना विचारलं असता ते म्हणाले, संजय राऊत निष्ठावंत शिवसैनिक (Shiv Sainik) तर आहेतच, बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक आहेत. उगाचच नाव लावून फिरत नाहीत, मुखवटे लावून फिरत नाहीत. त्यांच्यावरही दबावतंत्र वापरलं पण त्यांनी गद्दारी केली नाही. ते पळून गेले नाहीत. ते डरपोक नाहीत ते लोकांसमोर आलं आहे. जे डरपोक होते ते पळून गेले. असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर (Shinde Group) टीका केली.

टायगर इज बॅक – सुषमा अंधारे

संजय राऊतांना जामीन मिळताच सुषमा अंधारे (Sushma Andhare ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शेर वापस आया है, अशी प्रतिक्रिया दिली. यावेळी अंधारे भावूक झाल्या होत्या. त्यांचे डोळे पानावले होते. त्या म्हणाल्या, शिवसैनिकांमध्ये आज हजार हत्तीचे बळ संचारले आहे. आम्हाला संजय राऊतांचा अभिमान आहे. आज खऱ्या अर्थाने दिवाळी असून आम्ही उत्साहाने साजरी करणार आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid0LQtnSf29QMaRyZ4JW5KZZymS5XiNMXLUgmqkDbJGoCJ2NPMdnqCgakeYy5hVhZ6nl&id=100000324369123

सत्यमेव जयते! – रोहित पवार

संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी एक व्हिडिओ ट्विट केलाय. त्याला फक्त सत्यमेव जयते! असं कॅप्शन दिले आहे. पिंजऱ्यातून एक वाघ बाहेर पडत असल्याचा व्हिडिओ रोहित पवार यांनी ट्विट केला आहे.

कोबड्यांनी आपली पिल्ले घेऊन…- अंबादास दानवे

अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी ट्वीट करत राऊतांच्या जामीनावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, माननीय न्यायालयाने खासदार संजय राऊत यांना जमीन मंजूर केला आहे. न्यायालयाचे मनःपूर्वक आभार. विरोधकांनी आता आपल्या राजकीय सतरंज्या संभाळाव्यात. आणि हो, कोंबड्यांनी आपली पिल्ले घेऊन आता खुराड्यात जाण्याची वेळ आली आहे.

मी भविष्य सांगू शकत नाही – सुप्रिया सुळे

संजय राऊत लवकरच बाहेर येतील. मी भविष्य सांगू शकत नाही. वास्तवतेत जगते. आमचे जे-जे नेते जेलमध्ये आहेत. ते त्यांच्या केसमधून निर्दोष बाहेर येतील. ते महाराष्ट्र, भारताच्या सेवेत पूर्ण ताकदीने लागतील, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी दिली आहे.

न्यायव्यवस्थेचा योग्य निर्णय – सुनील राऊत

आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास होता. राज्यातील सर्व जनतेचे आशीर्वाद संजय राऊत यांच्याबरोबर होते.
न्यायवस्थेने योग्य निर्णय संजय राऊतांच्या पारड्यात टाकला. साडेतीन महिन्यानंतर बाहेर संजय राऊत येतील. त्यानंतर शिवसेनेचा (Shivsena) भगवा झेंडा महाराष्ट्राच्या विधानसभेवर फडकवण्यासाठी प्रयत्न करतील, असा विश्वास सुनील राऊत (Sunil Raut) यांनी व्यक्त केला.

पण सत्य मान्य केले पाहिजे – राधाकृष्ण विखे पाटील

न्यायालयीन प्रक्रिया आहे. त्यावर काही भाष्य करणार नाही. पूर्ण निकाल आल्यानंतर त्यावर भाष्य करता येईल,
अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिली आहे.
जल्लोष म्हणजे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) एक प्रकारे आसुरी आनंद व्यक्त करत आहे.
स्वत:चं अपयश झाकण्याचा महाविकास आघाडीचे नेते प्रयत्न करत आहे.
पण जे सत्य आहे ते मान्य केले पाहिजे, कोण तुरुंगात जाते, असेही पाटील म्हणाले.

त्यांच्याकडून चांगलं काम घडो – दीपक केसरकर

संजय राऊतांना जामीन मंजूर झाल्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी म्हटले,
(sanjay raut) संजय राऊतांना जामीन मिळाल्याच्या निर्णयाचं स्वागत आहे.
संजय राऊत यांच्यावर आमचा कुठलाही वैयक्तिक राग नाही.
त्यांना चांगलं आरोग्य लाभो, त्यांच्याकडून चांगलं काम घडो, अशा सदिच्छा.

Web Title :-  MP Sanjay Raut | sanjay raut bail maharashtra political leaders first reaction after granted bail on patra chawl land scam case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Supriya Sule | संजय राऊत यांच्या सुटकेने न्यायावरील आमचा विश्वास अढळ राहिला – सुप्रिया सुळे (VIDEO)

Sanjay Raut | ED ला न्यायालयाचा दणका, संजय राऊतांच्या जामिनाच्या स्थगितीची मागणी फेटाळली; होणार आजच सुटका