MP Sanjay Raut | एकच शिवसेना खरी, बाकी धोत्र्याच्या बिया; तुरुंगातून बाहेर येताच राऊतांचा एकनाथ शिंदेंवर पहिला वार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणात (Goregaon Patrachal Scam) शिवसेनचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांचा आज पीएमएलए कोर्टाने (PMLA Court) जामीन मंजूर (Bail Granted) केला. 100 दिवसानंतर संजय राऊत तुरुंगातून बाहेर आले. तुरुंगाबाहेर आल्यानंतर संजय राऊत (MP Sanjay Raut) आपल्या स्टाईलमध्ये परतले अन् पहिला वार एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर केला.

 

आम्ही शिवसैनिक आहोत, लढत राहू
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजय राऊत (MP Sanjay Raut) भव्य रॅलीत सामील होऊन घराकडे निघाले आहेत. यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले की, मी गेल्या 100 दिवसांपासून तुरुंगात होतो. बाहेर काय सुरु होतं, ते आत राहून कळत नव्हतं. बाहेर येऊन समजतंय की, आता उद्धव ठाकरेंची शिवसेना (Shiv Sena Uddhav Thackeray) झाली आहे. पण, आमचा कणा मोडलेला नाही. आम्ही शिवसैनिक आहोत, लढत राहू.

 

बाकी सगळ्या धोत्र्याच्या कडू बिया
संजय राऊत पुढे म्हणाले, आमचं आयुष्य बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि उद्धव ठाकरेंसोबत गेलं.
एकच शिवसेना खरी आहे, ती म्हणजे बाळासाहेबांनी निर्माण केलेली आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील.
बाकी सगळ्या धोत्र्याच्या कडू बिया आहेत. हा महाराष्ट्र-मुंबई कोणाच्या मागे आहे, ते त्यांना हळूहळू कळेलच,
अशा शब्दात त्यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता टीकास्त्र सोडलं.

… तर जळून खाक व्हाल
त्यांचे हे तात्पुरतं राजकारण सुरु आहे. आता बाहेर आलोय, हळूहळू कामाला लागू.
गेल्या 30-35 वर्षापासून मुंबई पालिकेवर (BMC) बाळासाहेबांचा भगवा फडकत आहे.
तो तसाच फडकत राहणार. त्या भगव्याला कोणी हात लावला, तर जळून खाक व्हाल.
असे तेज त्या भगव्यात बाळासाहेबांनी निर्माण केले आहे. आता तर मशाल आहे, असेही राऊत म्हणाले.

 

Web Title :-  MP Sanjay Raut | sanjay raut bail only one shiv sena is true the rest are bitter seeds sanjay raut

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rashmika Mandanna | सततच्या ट्रोलिंगला वैतागून रश्मीकाने केली ‘हि’ पोस्ट सोशल मीडियावर होत आहे व्हायरल

MP Sanjay Raut | तुरुंगाबाहेर येताच संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले-‘आलोय बाहेर… आता बघू, आम्ही…’

Har Har Mahadev | “‘हर हर महादेव’ चित्रपट बाबासाहेब पुरंदरेंनी लिहिला का?” आंनद दवेंची जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका