MP Sanjay Raut | संजय राऊतांनी व्यक्त केली इच्छा, म्हणाले – ‘माझ्या बायोपिकमध्ये…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार (Maha Vikas Aghadi Government) कोसळ्यानंतर खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांना पत्राचाळ प्रकरणात तुरुंगात जावे लागले होते. ते जवळपास तीन महिने तुरुंगात होते. त्यानंतर संजय राऊत (MP Sanjay Raut) हे सतत एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि भाजपवर (BJP) टीका करताना पाहाला मिळत आहेत. संजय राऊत हे स्पष्टवक्तेपणामुळे ओळखले जातात. एका मुलाखतीत त्यांना तुमच्या जीवनावर आधारीत बायोपीक (Biopic) काढायचे झाले त्याचे नाव काय असेल असे विचारण्यात आले. त्यावर त्यांनी ‘माझ्या बायोपिकचं नाव संजय उवाच असेल’ असे सांगितले.

सध्या राजकारणांच्या जीवनावर आधारित चित्रपट काढले जात आहे. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे (Shiv Sena Leader Anand Dighe) यांच्या जीवनावर आधारीत ‘धर्मवीर’ चित्रपट (Dharmaveer) आला. तसेच बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray) जीवनावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपट (Thackeray Movie) प्रदर्शीत झाला. एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात बोलताना संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी ‘ठाकरे’ चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्याची घोषणा केली. तसेच त्यांनी धर्मवीर चित्रपटाच्या येणाऱ्या दुसऱ्या भागाबद्दल भाष्य करताना एकनाथ शिंदेंना टोला लगावला.

धर्मवीर चित्रपटाचा दुसरा भाग येणार आहे. याबद्दल बोलताना राऊत म्हणाले, धर्मवीर एकमध्ये आनंद दिघे
यांचे निधन झाल्याचे दाखवलंय, मग दुसऱ्या भागात काय दाखवणार? आता दुसऱ्या भागात नवीन धर्मवीर कोण ते पाहायला मिळेल, असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदेंना डिवचलं. यावेळी त्यांना तुमच्या जीवनावर आधारित बायोपिक बनवल्यास तुमची भूमिका कोणी साकारलेली आवडेल. त्यावर ते म्हणाले मीच माझी भूमिका करेन. तुमच्या बायोपिकचं नाव काय असेल असे विचारण्यात आले, त्यावर ‘माझ्या बायोपिकचं नाव संजय उवाच’ असेल असे राऊत म्हणाले.

संजय राऊत यांच्या जीवनावर आधारित बायोपिक येईल की नाही हे येत्या काळात समजेल.
परंतु संजय राऊत यांनी आपल्या बायोपिकमध्ये आपणच अभिनय करावा, अशी इच्छा बोलून दाखवली.

Advt.

Web Title :- MP Sanjay Raut | sanjay raut comment on biopic name and who will do his role know details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut | ‘हे जिवंत सरकार नाही’; संजय राऊतांचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल…

MP Sanjay Raut | ‘धर्मवीर’ चित्रपटावरुन संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला, म्हणाले – ‘हा चित्रपट…’

Maharashtra Politics Issue | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी पुढे ढकलली, पुढील सुनावणी 14 फेब्रुवारी रोजी