MP Sanjay Raut | तुरुंगाबाहेर येताच संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले-‘आलोय बाहेर… आता बघू, आम्ही…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी (Goregaon Patrachal Scam) संजय राऊतांना ईडीने (ED) अटक केली होती. तेव्हापासून ते न्यायालयीन कोठडीत होते. दरम्यानच्या काळात संजय राऊतांकडून (MP Sanjay Raut) अनेकदा जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. परंतु प्रत्येक वेळी पीएमएलए न्यायालयाकडून (PMLA Court) राऊतांचा अर्ज फेटाळून लावला होता. अखेर आज न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर (Bail Granted) केला.

 

जामीन मंजूर झाल्यानंतर पावणे सातच्या सुमारास ते ऑर्थर रोड तुरुंगातून (Arthur Road Jail) बाहेर आले. शिवसेनेचे (Shivsena) हजारो कार्यकर्त्यांनी तुरुंगाबाहेर गर्दी करुन संजय राऊतांचे (Sanjay Raut) जंगी स्वागत केले. यावेळी शिवसैनिकांनी (Shiv Sainik) तुरुंगाबाहेर फटाके फोडत दिवाळी साजरी केली.

 

तुरुंगाबाहेर आल्यानंतर संजय राऊतांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. बाहेर आलोय, आता बघू, आम्ही लढणारे आहोत असे राऊत म्हणाले.
तसेच न्यायालयाने सांगितलंय आपली अटक बेकायदेशीर आहे. आम्ही लढणारे आहोत. माझी प्रकृती जरा बरी नाही.
मी प्रसारमाध्यमांशी यावर सविस्तर बोलणार असल्याचे सांगितले.

कार्यकर्त्यांनी पुढील कार्यक्रम ठरवला असल्याचे राऊत यांनी सांगितले.
संजय राऊत हे पहिले सिद्धिविनायकाचे (Siddhivinayak) दर्शन घेणार आहेत.
त्यानंतर ते बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray) स्मारकाचं दर्शन घेणार आहेत.

 

Web Title :-  MP Sanjay Raut | sanjay raut released from jail after pmla court granted him bail in patra chawl land scam case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Radhakrishna Vikhe Patil | ‘भारत जोडो’ यात्रा नसून जत्रा आहे – राधाकृष्ण विखे पाटील

MP Sanjay Raut | ‘सत्यमेव जयते! टायगर इज बॅक’, संजय राऊतांच्या सुटकेनंतर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया, जणून घ्या कोण काय म्हणाले?

Supriya Sule | संजय राऊत यांच्या सुटकेने न्यायावरील आमचा विश्वास अढळ राहिला – सुप्रिया सुळे (VIDEO)