MP Sanjay Raut | जर मर्द आहात तर समोर येऊन आमच्याशी लढा, संजय राऊतांचे शिंदे गटाला थेट आव्हान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सोमवारी संध्याकाळी ठाण्यातील शिवाई नगर येथील शिवसेना शाखा (Shivai Nagar Shivsena Shakha ) ताब्यात घेण्यावरुन ठाकरे गट (Thackeray Group) आणि शिंदे गटाचे (Shinde Group) पदाधिकारी व कार्यकर्ते एकमेकांना भिडले. शिंदे गटाने शिवाई नगर शिवसेना शाखेचे कुलूप तोडून शाखा ताब्यात घेतली. यावरुन आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला. तसेच जर मर्द आहात तर समोर येऊन आमच्याशी लढा, असे आव्हान संजय राऊतांनी (MP Sanjay Raut) दिले.

संजय राऊत (MP Sanjay Raut) म्हणाले, ज्याप्रकरारे पोलीस सत्तेचा वापर करुन जे काही ओरबाडून नेलं जात आहे, ते सगळं आम्ही परत मिळवू, हे फक्त काही दिवसांसाठी आहे. ना ही सत्ता राहील, ना ही दादागिरी राहील. पोलीस आमच्या लोकांविरोधात सत्तेचा वापर करत आहेत. याचा अर्थ तुम्ही घाबरलात. जर मर्द आहात तर समोर येऊन आमच्याशी लढा, बघून घेऊ, असं राऊत म्हणाले.

मर्द असाल तर…

हे ठाण्यातच काही ठिकाणी चाललंय. या गटाचे अस्तित्व ठाण्यातच आहे. हे स्वत:ला शिवसैनिक म्हणवणाऱ्यांचं काम नाही. मर्द असाल तर समोर या. पोलिसांच्या आडून हल्ले करु नका. खेडच्या सभेनंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. कसब्यात विजय, चिंचवड भाजपचा (BJP) विजय नाही. हे पाहिल्यावर भाजप किंवा मिंधे गट दुसरं काय करणार? पण आमचा शिवसैनिक मागे हटणार नाही, असं राऊत यांनी सांगितलं.

शिवसैनिकांना ताब्यात घेत असाल तर…

मी त्यांना सांगतो. ठाण्यात जे चाललंय ते थांबवा. सत्ता आज आहे उद्या नाही. भाजप तुमचा वापर करुन घेत आहे.
हे तुम्हाला भविष्यात समजेल की तुम्ही किती मोठी चूक केली.
पोलिसांचा वापर करुन जर तुम्ही शिवसैनिकांना ताब्यात घेत असाल, तर ते मुख्यमंत्रीपदाला शोभणारं नाही,
अशा शब्दात संजय राऊतांनी शिंदे गटाला सल्ला दिला.

Web Title :- MP Sanjay Raut | sanjay raut slams shinde group naresh mhaske on thane branch office issue

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune NCP | महागाई विरोधात केंद्र सरकारच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची होळी (व्हिडिओ)

PMPML Strike | पीएमपीएमएलचा संप त्वरित मिटवा, आमदार रवींद्र धंगेकर यांची मागणी

Kolhapur Crime News | अनैतिक संबंधाच्या वादातून तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून खून, कोल्हापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना