MP Sanjay Raut | ‘… तर 20 फूट जमिनीत गाडू…होय, ही धमकी समजा’, संजय राऊतांचा शिंदे गटाला इशारा

मालेगाव : पोलीसनामा ऑनलाइन – उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची नुकतीच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे सभा झाली. यावेळी त्यांनी भाजप (BJP) आणि शिंदे गटावर (Shinde Group) जोरदार हल्लाबोल केला. यानंतर मालेगाव येथे उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) मालेगाव येथे आले आहेत. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी शिंदे गटाला थेट धमकीवजा इशारा दिला आहे.

 

संजय राऊत (MP Sanjay Raut) म्हणाले, उद्धव ठाकरे यांची सभा मालेगाव (Malegaon) येथे होणार आहे. सभेच्या तयारीसाठी मी येथे आलो आहे. खरं तर, आमदारांना पाडण्याची गरज नाही, तो आधीच पडलेला आहे. उद्धव ठाकरे इकडे येत आहेत ते आमदारांना पाडण्यासाठी नाही तर गाडण्यासाठी येत आहेत. मालेगावातून महारष्ट्राला संदेश देण्यासाठी उद्धव ठाकरे येत आहेत. महाराष्ट्र अखंड जात-पात आणि धर्मभेद गाडून उभा आहे. त्यासाठीच मालेगावची निवड केल्याचे राऊत यांनी सांगितले.

 

संजय राऊत पुढे म्हणाले, जेव्हा मी एखाद्याला गाडायचं ठरवतो, त्याला गाडतोच. आज त्याची सुरुवात झाली आहे.
परवा मला दिल्लीत एका मुलाखतीत विचारण्यात आले, हे गद्दार शिवसेना भवनावर (Shiv Sena Bhavan) चाल करुन येणार आहेत.
मी म्हटलं येऊ द्या.. त्यांना 20 फूट जमिनीच्या आतमध्ये गाडल्याशिवाय राहणार नाही. 20 फूट जमिनीच्या खाली गाडू… ही धमकी आहे का? असं विचारल्यावर मी म्हटलं.. होय, धमकी आहे असं समजा.
ही नुसती धमकी नाही, तर ही धमकी कृतीत उतरवण्याची क्षमता आमच्यात आहे, अशा शब्दात संजय राऊतांनी शिंदे गटाला धमकीवजा इशारा दिला आहे.

 

Web Title :- MP Sanjay Raut | sanjay raut speech in nashik malegaon in the eve of uddhav thackeray rally

 

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी चिंचवडमध्ये झळकले कुख्यात गुन्हेगार नीलेश घायवळच्या वाढदिवसाचे बॅनर्स, प्रचंड खळबळ

MP Supriya Sule | खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून राष्ट्रपतींना दौंड आणि इंदापूर भेटीचे निमंत्रण

Mohan Joshi Pune | ‘पराभवाच्या भीतीने भाजपने कॅन्टोन्मेंट बोर्डच्या निवडणुका पुढे ढकलल्या’ – मोहन जोशी