MP Sanjay Raut | संजय राऊतांच्या आरोपावर प्रत्युत्तर देताना शिंदे गटाच्या आमदाराची जीभ घसरली, म्हणाले-‘संजय राऊत हा…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावरुन (Maharashtra-Karnataka Border Issue) विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. या मुद्यावरुन विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यातच शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर आरोप केला आहे. बोम्मई (Karnataka CM Basavaraj Bommai ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कानशिलात लगावतात आणि शिंदे चोळत बसतात असा आरोप संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केला. या आरोपाला प्रत्युत्तर देताना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Shinde Group MLA Santosh Bangar) यांची जीभ घसरली.

संजय बांगर म्हणाले, संजय राऊत (MP Sanjay Raut) हा पागल झालेला, पिसाळलेला कुत्रा आहे. त्याच्या कानशिलात वाजविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, ते ज्या प्रकारे वक्तव्य करत आहेत, जिथे मिळेल तिथे संजय राऊत यांना ठेचल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात बांगर यांनी राऊतांच्या आरोपांचा समाचार घेतला. यावेळी टीका करताना बांगर यांची जीभ घसरली. दरम्यान, संजय राऊत यांनी पाच महिन्यापूर्वी चाळीस रेडे कामाख्या देवीला (Kamakhya Devi) बळी देणार असल्याचे वक्तव्य केले होते.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah)
यांनी एकनाथ शिंदे आणि बोम्मईंना एकाच खोलीत बंद करावे तरच यावर तोडगा निघेल,
असे पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी म्हटले होते.
यावर बोलताना बांगर म्हणाले, या लोकांना दुसरं काही काम उरलेलं नाही.
कुठली जागाच उरलेली नाही. त्यांच्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही.
तसेच ग्राम पंचायत निवडणुकीत (Gram Panchayat Elections) दोन्ही बाजू आपणच आघाडीवर
असल्याचे सांगत आहेत, त्यावर ग्राम पंचायतमध्ये मीडियाने दाखविले आहे कोण पुढे आहे.
त्यामुळे जनतेला विरोधकांच्या दाव्याचा काही फरक पडणार नसल्याचे बांगर म्हणाले.

Advt.

Web Title :- MP Sanjay Raut | sanjay raut will be crushed wherever he can meet mlas santosh bangar of eknath shinde group sleep of tongue

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Gram Panchayat Result | गुराखी बनला सरपंच, वर्गणी काढून लढवली निवडणूक, भाजपा-काँग्रेसच्या दिग्गजांचा पराभव

Pune Crime | काजूकतली फुकट न दिल्याने गोळीबार; सिंहगड रोडवरील मिठाईच्या दुकानातील घटना