MP Sanjay Raut | भाजपकडून मैत्रीचा हात आला तर युती होणार का? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – धुलीवंदनाच्या कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलताना आम्ही विरोधकांना माफ केलं आणि कटुता संपवली, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले होते. त्यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांना भाजपकडून मैत्रीचा हात आला तर तो स्वीकारणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर संजय राऊतांनी (MP Sanjay Raut) भाजपबरोबर (BJP) अजिबात हातमिळवणी करणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

यावेळी संजय राऊतांनी (MP Sanjay Raut) शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडलं. एक हिंदुत्ववादी पक्ष आणि केंद्रीय यंत्रणा आणि पैशाचा वापर करुन फोडला. ही वेदना महाराष्ट्रातील जनता कधीच विसरणार नाही. राज्यातील जनताच आता ठरवेल यांना माफ करायचं की नाही. राजकारणात मतभेद होत असतात मात्र त्यांनी बाळासाहेबांनी तयार केलेला अख्खा पक्षच फोडला. भाजपकडून हात आला तरी तो आता कधीही स्वीकारला जाणार नसल्याचे राऊतांनी सांगितलं.

मनसेला शुभेच्छा देणार का?

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) वर्धापन दिन आहे. यानिमित्त त्यांना शुभेच्छा देणार का? असा
प्रश्न संजय राऊतांना विचारला. यावर बोलताना राऊत म्हणाले, या महाराष्ट्रात प्रमुख पदावर काम करणारे
सगळेच लोक हे शिवसेनेतच (Shivsena) होते. शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)
नसते तर आपण कुठे असतो याची उजळणी आणि आत्मचिंतन प्रत्येकानं केलं पाहिजे, असे म्हणत मूळ
शिवसेना जागेवरच असल्याचे संजय राऊतांनी सांगितले.

Web Title : MP Sanjay Raut | sanjay rauts reaction on the thackeray group bjp alliance

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ravindra Dhangekar | मी रवींद्र लक्ष्मीबाई उर्फ सुलोचना हेमराज धंगेकर…, नवनिर्वाचीत आमदार रवींद्र धंगेकरांनी घेतली शपथ

Nagpur Crime News | चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीची निर्घृणपणे हत्या

Pune News | हिमतीने समोर गेल्यास महिला जग जिंकेल; जागतिक महिला दिनी आबेदा इनामदार यांचे प्रतिपादन