MP Sanjay Raut | संजय राऊतांवर पुन्हा हक्कभंग प्रस्ताव येणार?, संजय शिरसाट यांचे विधानसभा अध्यक्षांना पत्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा (Maharashtra Political Crisis) निकाल लागला. 16 आमदारांच्या अपात्रतेचा (16 MLAs Disqualification) निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा असे सुप्रीम कोर्टाने सांगितले. यानंतर विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर (Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar) यांनी लवकरात लवकर 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घ्यावा अशी मागणी खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) करत आहेत. तसेच अध्यक्षांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप शिंदे गटाचे (Shinde Group) आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्यावर करुन त्यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव (Infringement Proposal) दाखल करावा अशी मागणी नार्वेकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

 

काय म्हटले पत्रात?

संजय शिरसाट यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, संजय राऊत (MP Sanjay Raut) हे गेल्या अनेक दिवसांपासून अध्यक्षांविरोधात बेताल आरोप करत आहेत. त्यांच्या अधिकारांवर शंका घेत आहेत. एवढंच नाही तर मुख्यमंत्र्यांबाबतही वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. हे सरकार घटनाबाह्य आणि बेकायदेशीर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर हक्कभंग दाखल करण्यात यावा अशी मागणी शिरसाट यांनी केली आहे.

 

विधानसभा अध्यक्ष हे विधानमंडळ आणि विधानसभा सचिवालयाचे प्रमुख, पीठासीन अधिकारी (Presiding Officer) असतात. विधानसभा अध्यक्षांना घटना, कार्यपद्धती, नियम आणि संसदीय परंपरांच्या अंतर्गत अधिकार आहेत. कायदेमंडळाच्या अध्यक्ष या नात्याने विधानसभा अध्यक्ष हे न्यायाधीशांच्या भूमिकेत असतात. अध्याक्षांच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) देखील आव्हान देता येत नाही, इतके अधिकार विधानसभा अध्यक्षांना दिलेले असतात. अशा परिस्थितीत संजय राऊत यांच्याकडून अध्यक्षांवर होत असलेले आरोप गंभीर आहेत, असंही शिरसाट यांनी म्हटलं आहे.

विधानसभा अध्यक्ष हे विधिमंडळाच्या कर्यप्रणालीत कोणत्याही पक्षाचे नेतृत्व करत नाहीत किंवा कोणत्याही पक्षाची झालर लागलेली नसते
तर ते सर्वच पक्षांचे विधिमंडळातील पीठासन अधिकारी असतात. त्यामुळे त्यांच्यावर खोटे,
बेफाम आरोप करुन जनमानसात त्यांची प्रतिमा मलिन करण्याबरोबरच विधिमंडळाचे पावित्र्य धोक्यात आणण्याचे काम संजय राऊत करत आहेत.
त्यांच्याकडून विधानसभा अध्यक्षांवर केले जाणारे आरोप हे त्यांना धमकावण्यासाठी केले जात आहेत.
राऊत यांच्याकडून विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारावर गदा आणण्याचा प्रयत्न केला जात असून
तो हक्कभंग या प्रकारात मोडत असल्याची आमची धारणा आहे, असं संजय शिरसाट यांनी लिहिलेल्या पत्रात नमूद केलं आहे.

 

 

Web Title :  MP Sanjay Raut | sanjay shirsats letter to the legislative assembly speaker

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा