MP Sanjay Raut | ‘… त्या दिवशी संजय राऊत हे शरद पवारांच्या मांडीवर बसलेले दिसतील’, शिंदे गटाच्या आमदाराचा टोला

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर भूखंडाचा आरोप केला आहे. यानंतर शिंदे गटाकडून (Shinde Group) विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले जात असल्याचे पहायला मिळत आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी याच मुद्यावरुन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. ज्या दिवशी शिवसेना संपेल त्या दिवशी संजय राऊत (MP Sanjay Raut) हे शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या मांडीवर बसलेल दिसतील अशा शब्दात शिरसाट यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे.

 

संजय शिरासट यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना म्हटले, तुमची सत्ता होती तेव्हा तुम्ही कोणत्याही गोष्टींची चौकशी केलेली नाही. या उलट एकनाथ शिंदे यांना त्रास दिला. त्यांच्या कामाचा झंजावत सुरु असल्याने अशापद्धतीचे आरोप करण्यात येत असल्याचे शिरसाट यांनी म्हटलं आहे. सध्या उद्धव ठाकरे यांची शिवसेना (Shivsena) ही राष्ट्रवादी चालवत असल्याचा आरोप शिरसाट यांनी केला आहे.

 

यावेळी संजय शिरसाट यांनी खासदार संजय राऊत यांना देखील टोला लगावला.
सध्या उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही राष्ट्रवादी काँग्रेस चालवत आहे.
संजय राऊत हे शिवसेनेचे नाही तर शरद पवारांचे प्रवक्ते आहेत.
ज्या दिवशी शिवसेना संपेल त्या दिवशी संजय राऊत हे शरद पवारांच्या मांडीवर बसलेले दिसतील, असा टोला त्यांनी लगावला.

 

Web Title :- MP Sanjay Raut | shinde group mla sanjay shirsat criticizes sanjay raut and uddhav thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MP Sanjay Raut | बिल्डर सूरज परमारच्या डायरीत कुणाचं नाव? संजय राऊतांची SIT चौकशीची मागणी

Ashish Shelar | संजय राऊतांनी रावणरक्षा वाचण्यापेक्षा रामरक्षा वाचावी – आशिष शेलार

Shambhuraj Desai | ‘बाळासाहेबांनी इतरांना आधार दिला आता त्यांच्याच मुलाला आणि नातवाला…’; शंभूराज देसाईंची उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र