MP Sanjay Raut | UP मध्ये येत्या विधानसभा निवडणुकीत ‘शिवसेना’ स्वबळावर लढणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  उत्तरप्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणुकीची (UP Assembly elections) रणधुमाळी होणार आहे. या विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु आहे. या निवडणुकीसाठी अनेक पक्ष आपली कंबर कसत आहे. यावरूनच आता शिवसेनेचे नेते (Shivsena) आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी एक मोठं विधान केलं आहे. उत्तरप्रदेश राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना (Shivsena) स्वबळावर लढणार असल्याचं भाष्य संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केलं आहे. राऊत यांच्या या विधानावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

संजय राऊत बोलतांना म्हणाले की, ‘समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी राजदची आघाडी होत असली तरी उत्तरप्रदेश संदर्भात आमची काही भूमिका नाही.
सपा, राष्ट्रवादी आणि राजदच्या आघाडीला पाठिंबा का द्यावा? असा प्रश्न देखील राऊत यांनी उपस्थित केला आहे.
तसेच, उत्तर प्रदेशमध्ये शिवसेना (Shivsena) निवडणूक लढवेल, पण स्वतंत्रपणे लढवेल.
त्यांची आघाडी त्यांच्यापाशी त्यांच्या आघाडीला शुभेच्छा.
आम्ही उत्तर प्रदेशात आमच्या ताकदीनुसार निवडणूक लढवणार असल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

या दरम्यान, संजय राऊत यांनी शरद पवार (Sharad Pawar) आणि ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या भेटीवरून देखील भाष्य केलं आहे.
त्यावेळी ते म्हणाले, ‘ममता बॅनर्जी यांचे शरद पवारांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. उद्धव ठाकरेंशी संबंध चांगले आहेत.
ममतांचं म्हणणं आहे की, आधी एकत्र यावं. नेता कोण असावं हे नंतर ठरवता येईल.
तृणमूल (TMC) पक्षाची बैठक असल्यानं त्या बैठकीला उपस्थित राहू शकले नाही, असं राऊत म्हणाले.

 

Web Title : MP Sanjay Raut | shiv sena mp sanjay raut reaction about uttar pradesh assembly election

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune-Nashik Railway | पुणे-नाशिक रेल्वेने मार्गाने पकडली गती; 12 पैकी 7 गावातील भूसंपादन प्रक्रिया पूर्ण

IIT Bombay Recruitment 2021 | मुंबईच्या इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे ‘या’ पदांसाठी लवकरच भरती

Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सांगितला ‘फडणवीस’ आडनावाचा ‘अर्थ’