MP Sanjay Raut | ‘मविआत तणाव, मविआचा भाग व्हायचं असेल तर…’, संजय राऊतांचा प्रकाश आंबेडकरांना सल्ला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना Shivsena (ठाकरे गट-Thackeray Group) आणि वंचित बहुजन आघाडीची (Vanchit Bahujan Aghadi) युती उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)-प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी घोषित केली. परंतु काही दिवसांतच युतीत तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी नाराज झाली आहे. त्यातच आता खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी प्रकाश आंबेडकर यांना सूचक सल्ला दिला आहे. महाविकात आघाडीचा भाग व्हायचा असेल तर त्यांनी महाविकास आघाडीतील स्तंभावर बोलू नये, असा सल्ला संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी प्रकाश आंबेडकर यांना दिला आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देशाचे नेते आहेत. भाजपविरोधात (BJP) आघाडी तयार करण्याच्या प्रयत्नातील शरद पवार हे मुख्य स्तंभ आहेत. सातत्याने ते या आघाडीसाठी प्रयत्न करत आहेत. भाजपच्या यंत्रणेने सर्वात जास्त हल्ले हे शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर केले आहेत. सध्या शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाली आहे. पुढील काळात ते मविआचे (Mahavikas Aghadi) घटक व्हावेत अशी आमची इच्छा आहे. मात्र, असं होणार असेल तर त्यांनी या आघाडीचे जे प्रमुख स्तंभ आहेत त्यांच्यावर बोलू नये, असा सल्ला संजय राऊतांनी (MP Sanjay Raut) प्रकाश आंबेडकर यांना दिला आहे.
संजय राऊत पुढे म्हणाले, त्यांचे मतभेद असतील पण त्यांनी अशी वक्तव्य करु नयेत.
मी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा केली आहे.
भविष्यात आम्ही एकत्र बसून त्यांच्यात काय मतभेद असतील तर ते दूर करु.
मात्र, प्रकाश आंबेडकर यांनी मविआच्या स्तंभावर अशी वक्तव्य करु नयेत, असे संजय राऊत यांनी म्हटले.
ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
Web Title :- MP Sanjay Raut | shivsena leader sanjay raut advised vanchit bahujan aghadi president prakash ambedkar not to talk about mahavikas aghadi leaders
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Jayant Patil | शरद पवार यांच्यावरील ‘त्या’ विधानावर जयंत पाटील यांचा यू-टर्न; म्हणाले…
Pune Fire | पुण्यात आग्नितांडव! तीन दुकाने जळून खाक; समोर आले आग लागण्याचे कारण