मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी शुक्रवारी भाजपवर (BJP) टीका करताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. मध्यंतरीच्या काळात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसह (Chhatrapati Shivaji Maharaj) अन्य महापुरुषांबद्दल केलेल्या वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले होतं. त्यावेळी विरोधकांनी राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. याच मुद्यावरुन शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी टीकास्त्र सोडलं आहे.
संजय राऊत (MP Sanjay Raut) म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावर यांची वाचा गेलेली आहे. तुम्ही आम्हाला काय सांगता? मुळात भाजपच्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कधीच प्रेम नव्हतं. काही वर्षापूर्वी नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणारे होर्डिंग्ज लागले. परंतु त्यांना छत्रपती शिवाजी महाराज, मराठी साम्राज्य, मराठी माणूस यांच्याविषयी अजिबात प्रेम नाही. हे सगळं वरवरचं चाललं आहे, आतमधून ओठांवर यावं लागतं, असं राऊत म्हणाले.
जर खरं प्रेम असतं तर…
जर ते प्रेम खरोखर असतं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राजभवनाच्या दरवाज्यावर लाथ मारुन आत गेले असते आणि राज्यपालांनी जो शिवजी महाराजांचा अपमान केला त्यावर जाब विचारला असता. संपूर्ण सरकार दिल्लीला आलं असतं आणि अमित शाह (Amit Shah) यांना भेटून सांगितलं असतं, की शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या या राज्यापालाला ताबडतोब बदला. परंतु तसं झालं नाही, हे ढोगी लोक असल्याची टीका राऊत यांनी केली.
Web Title :- MP Sanjay Raut | shivsena leader sanjay raut criticized chief minister
eknath shinde and deputy chief minister devendra fadnavis
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Pune Crime News | पुण्यात कोयते उगारून दहशत निर्माण करणार्यांवर कठोर कारवाई – पोलिस आयुक्त रितेश कुमार (Video)
- Chhagan Bhujbal | ‘माझा डोळा विरोधी पक्ष पदावर नाही तर…’, बावनकुळेंच्या टीकेला छगन भुजबळांचे प्रत्युत्तर
- Rajasthani Pravasi Samaj | पुणे ते जोधपूर रेल्वेसेवा दररोज सुरु करा ! अखिल राजस्थानी समाज संघाचे रेल्वे अधिकाऱ्यांना निवेदन