MP Sanjay Raut | ‘कसबा तो झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है’, चिंचवडचा निकाल भाजपचा नसून ‘जगताप पॅटर्न’चा; संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल (व्हिडिओ)

MP Sanjay Raut | shivsena mp sanjay raut comment on lokabha election 2024 maha vikas aghadi in pune
file photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) हे पुणे दौऱ्यावर असून त्यांनी कसबा आणि चिचंवड पोटनविडणुकीवरुन (Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election) भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल केला आहे. या दोन्ही मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतून धडा मळाला आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) म्हणून लढलो तर कसब्यासारखा निकाल लागतो. थोड जर एक घटकपक्ष बाजूला गेला तर चिंचवड सारखा निकाल लागतो. दोन्ही ठिकाणेच निकाल हे महाविकास आघडीला मार्गदर्शक आहे. 2024 पर्यंत मविआने एकत्रित काम केलं, एकजूट दाखवली तर विधानसभेला 200 पेक्षा अधिक जागा निवडून येतील आणि लोकसभेला 40 जागा येतील असा दावा संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केला आहे.


चिंचवडचा विजय जगताप पॅटर्नचा
चिंचवडमध्ये आमच्याकडून काही बाबतीत चूक झाली. चिंचवडचा विजय हा भाजपचा विजय आहे हे कोणीच मानणार नाही. चिंचवडमध्ये मागील अनेक वर्षापासून जगताप पॅटर्न (Jagtap Pattern) चालत आहे. हा विजय भाजपचा नसून जगताप पॅटर्नचा असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. जर उमेदवार निवडताना अधिकची काळजी घेतली असती किंवा राहुल कलाटेंनी (Rahul Kalate) माघात घेतली असती तर महाविकास आघाडीचा विजय निश्चित होता असेही राऊत (MP Sanjay Raut) यांनी सांगितले.

 

पुणेकर अभिनंदनास पात्र
पुणेकरांना विकत घेण्याचा प्रयत्न झाला. पण पुणेकर मतदार त्याला बळी पडले नाहीत. ते अभिनंदनास पात्र आहेत. मतदारांच्या घरात पैसे फेकण्यात आले. रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हे सामान्य कार्यकर्ते आसल्याने ते असं करु शकत नाहीत. लोकांनी धनशक्ती लाथाडली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि त्यांचे कॅबिनेट कसब्यात मंत्रिमंडळ बैठका घेत बसले होते. कसबा तो झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है, असंही संजय राऊत म्हणाले.

 

शक्य असेल तिथे मविआ म्हणून लढू
संजय राऊत पुढे म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा विषय हा स्थानिक पातळीवर घेतला जातो. ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढू. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद हा वेगळा विषय आहे. हा विषय लोकसभा आणि विधानसभेचा असल्याचे संजय राऊत म्हणाले.

 

40 आमदारांनी त्यांचं अंतरंग तपासावं
शिंदे गटाच्या आमदारांच्या मागणीप्रमाणे अटक होणार असेल तर होऊन जाऊ द्या.
कायदा, न्यायालय, पोलीस हे पूर्णपणे खोक्यानं चिरडलेलं नाही. अजूनही रामशास्त्री जिवंत आहे.
40 आमदारांनी त्यांचं अंतरंग तपासावं, असा टोला संजय राऊतांनी लगावला. तसेच मी विधीमंडळाचा पूर्ण आदर करतो.
माझं वक्तव्य हे विशिष्ट फुटीर गटापुरतं होतं. विधीमंडळाचा मी अपमान करणार नाही.
कारण मी त्या सभागृहाचा सदस्य असल्याचे राऊत यांनी सांगितले.

 

Web Title :- MP Sanjay Raut | shivsena mp sanjay raut comment on lokabha election 2024 maha vikas aghadi in pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

PMPML | पीएमपीएमएलच्या ‘तेजस्विनी’ बसमधून महिलांना मोफत प्रवास, 8 मार्च पासून बससेवा पुर्ववत

Pune Traffic Police | येरवडा वाहतूक विभागाअंतर्गत नो पार्किंगबाबत नवे आदेश जारी

MLA Sunil Tingare | सिद्धार्थनगर रस्ता बाधितांना हक्काची घरे मिळावीत व भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, आमदार सुनिल टिंगरे विधानसभेत मागणी

Pune PMPML News | फुकट्या प्रवाशांना पीएमपीएमएलचा दणका, दंडाच्या रक्केम मोठी वाढ

Total
0
Shares
Related Posts
Parvati Assembly Election 2024 | In the presence of Ashwini Kadam, Parvati Assembly Maviya ward-wise review meeting; "This election should be fought according to the problems in the constituency" is the tone of office bearers and activists

Parvati Assembly Election 2024 | अश्विनी कदम यांच्या उपस्थितीत पर्वती विधानसभा मविआ प्रभागनिहाय आढावा बैठक; ” मतदारसंघातील समस्यांना अनुसरून ही निवडणूक लढली जावी” पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा सूर