MP Sanjay Raut | सीमाप्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री पुन्हा गुवाहाटीला जाणार आहेत का?, संजय राऊतांचा खोचक सवाल

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मागील काही दिवसांपासून कर्नाटक सीमाप्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी याप्रकरणी भाष्य केले आहे. कर्नाटकमधील संघटनांनी आपल्या राज्यातील एका गावात येऊन त्यांचे झेंडे फडकवले आणि याचवेळी मला बेळगाव न्यायालयाने समन्स बजावले. त्यामुळे घटनाक्रम पाहता. राज्यातील छुप्या संघटना याला पाठिंबा देत आहेत, असा दावा संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केला आहे.

एकीकडे सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे, तर दुसरीकडे कर्नाटकातील कानडी संघटना आपल्या राज्यात येऊन झेंडे लावत आहेत. त्यामुळे कोणीतरी या संघटनांना राज्यातून छुपा पाठिंबा देत आहे. त्याच वेळी मला बेळगाव न्यायालयाने समन्स पाठविले आहे. मी तिकडे गेलो की, माझ्यावर हल्ला होणार असल्याची माझ्याकडे माहिती आहे. मी प्रक्षोभक भाषण केले सांगत 2018 साली झालेले प्रकरण आता काढत आहेत. मला तिथे अटक करण्याचा डाव आहे. पण, मी घाबरणारा नाही, आलेल्या परिस्थितीला मी सामोरा जाईन, मी बेळगाव न्यायालयात हजर राहणार आहे, असे राऊत (MP Sanjay Raut) यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमावादावर तोडगा काढण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि राज्य उत्पादन शूल्क मंत्री शंभुराज देसाई यांची नियुक्ती केली आहे. येत्या 3 डिसेंबर रोजी ते दोघे कर्नाटकला जाणार आहेत. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी राज्य सरकारच्या भूमिकेवर भाष्य केले. आतापर्यंतचे सगळ्यात दुबळे आणि कणा नसलेले सरकार म्हणजे शिंदे फडणवीसांचे सरकार, असे राऊत म्हणाले. सीमाप्रश्नावर मला काय वाटते, यापेक्षा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना काय वाटते हे महत्वाचे आहे. महाराष्ट्रात घुसखोरीची भाषा होत असताना, शिंदे फडणवीस सरकार शांत का आहे? अस्थिर, दुबळे आणि विकलांग सरकार राज्यात सत्तेत आहे. यांच्याकडून राज्याचे रक्षण होईल, असे आम्हाला वाटत नाही, असे यावेळी राऊत म्हणाले.

कर्नाटकमधील संघटनांच्या कार्यकर्त्यांची महाराष्ट्रात घुसून झेंडे फडणकवण्याची हिंम्मत होतेच कशी? महाराष्ट्रातून कानडींना कुणाचा छुपा पाठिंबा? शिंदे फडणवीस सरकार सीमाप्रश्नी काही रोखठोक भूमिका घेणार आहे की नाही? की अजूहनी हात चोळत बसणार आहे? अशा प्रश्नांची सरबत्ती करत शिंदे सीमाप्रश्नी गुवाहाटीला जाऊन सरकार नवस करणार आहात का? असा खोचक सवाल संजय राऊत यांनी विचारला.

Web Title :- MP Sanjay Raut | shivsena mp sanjay raut slam shinde fadanvis government over maharashtra karnataka border dispute

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Fire News | चांदणी चौकात ‘पीएमटी’ बसला आग, चालकाच्या प्रसंगावधानामुळे जीवितहानी टळली

Eknath Khadse | ‘मग एवढे दिवस तुझी जबान चूप का राहिली?’ एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांना एकेरी भाषेत सुनावलं

Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार? सर्वसामान्यांना दिलासा मिळणार