MP Sanjay Raut | ‘संतोष बांगर यांच्यात हिंमत असेल तर राऊतांच्या…’, ठाकरे गटाच्या नेत्याचं खुलं आव्हान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावरुन (Maharashtra-Karnataka Border Issue) विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. या मुद्यावरुन विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यातच शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर आरोप केला आहे. बोम्मई (Karnataka CM Basavaraj Bommai) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कानशिलात लगावतात आणि शिंदे चोळत बसतात असा अरोप संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केला. या आरोपाला प्रत्युत्तर देताना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Shinde Group MLA Santosh Bangar) यांनी इशारा दिला होता.

 

संजय बांगर म्हणाले, संजय राऊत (MP Sanjay Raut) हा पागल झालेला, पिसाळलेला कुत्रा आहे. त्याच्या कानशिलात वाजविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, ते ज्या प्रकारे वक्तव्य करत आहेत, जिथे मिळेल तिथे संजय राऊत यांना ठेचल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात बांगर यांनी राऊतांच्या आरोपांचा समाचार घेतला. यावेळी टीका करताना बांगर यांची जीभ घसरली.

 

संतोष बांगर यांच्या इशाऱ्यानंतर हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख विनायक भिसे (Vinayak Bhise) यांनी थेट बांगरांना खुलं आव्हान दिले आहे.
संतोष बांगरांनी संजय राऊतांबद्दल अपशब्द काढले आहेत. संतोष बांगरांना सांगू इच्छितो,
संजय राऊतांना हिंगोली जिल्ह्यात घेऊन येणार आहोत. आमदार बांगर यांच्यात हिंमत असेल,
तर संजय राऊतांच्या अंगाला काय गाडीला हात लावून दाखवावा. मग त्यांना त्यांची जागा दाखवू देऊ, असे भिसेंनी यांनी म्हटले.

 

Web Title :- MP Sanjay Raut | shivsena thackeray group vinayak bhise challenge sanoths bangar touch sanjay raut body

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Ajit Pawar | गायरान प्रकरणावरुन अजित पवार आक्रमक, म्हणाले-‘अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा’

Income Tax Alert! जर बहुतांश व्यवहार कॅशने करत असाल तर व्हा अलर्ट, येऊ शकते नोटीस, जाणून घ्या नियम

Fixed Deposit | ७०० दिवसाच्या एफडीवर ही बँक देते ७.६०% व्याज, जाणून घ्या डिटेल्स