MP Sanjay Raut | सावधान रहो शेर आ रहा है, संजय राऊतांच्या जामीनानंतर भास्कर जाधवांचे विरोधकांना खुले चॅलेंज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ठाकरे गटाची (Thackeray Group) तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांची आज जामीनावर सुटका करण्यात आली. 102 दिवस न्याययालयीन कोठडीत (Judicial Custody) असणारे संजय राऊत यांचा पीएमएलए कोर्टाने (PMLA Court) अखेर जामीन मंजूर (Bail Granted) केला. दरम्यान ईडीने (ED) जामीन स्थगित करण्याची मागणी केली होती. मात्र कोर्टाने ईडीची ती मागणी फेटाळून लावली त्यामुळे संजय राऊत (MP Sanjay Raut) यांचा जेल बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. संजय राऊत बाहेर येणार हे समजताच शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला. तर भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी संजय राऊतांच्या सुटकेने भावूक झाल्याचे पहायला मिळाले.

आज आम्ही सगळेच आनंदाश्रूंनी नाहून निघतोय. संजय राऊत (MP Sanjay Raut) हे आमचे लढवये, तत्वनिष्ठ नेते आहेत. आपल्या भूमिकेशी ठाम राहणारे नेते. हे नेते गेल्या दोन चार वर्षापासून या राज्यात लोकशाहीवर जो घाला घातला जात होता, या लोकशाहीचं अधोपतन केलं जात होतं, लोकशाहीच्या नावावर संपूर्ण देशाला अधोगतिच्या दिशेने नेलं जात होतं, त्याविरोधात ते आपल्या लेखणीने प्रहार करत होते. त्यांना नाना प्रकारे थांबवण्याचे प्रयत्न केले. पण ते काही थांबले नाहीत. शेवटचा उपाय म्हणून त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं. जेलमध्ये गेल्यावरही ते दमले नाहीत, थकले नाहीत, ते सरेंडर झाले नाहीत ते आणखी ताकदीने उभे राहिले, असे भास्कर जाधव यांनी म्हटले.

आज संजय राऊत जेलमधून बाहेर येणार आहेत. आज माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आहेत.
आमचे नेते जेलमधून बाहेर पडले, अशा प्रकारे जे-जे नेते जेलमध्ये आहेत ते बाहेर पडतील,
असंही भास्कर जाधव म्हणाले. ज्या लोकांनी त्यांना जेलमध्ये टाकलं त्यांना मी एकच सांगेन-सावधान रहो
शेर आ रहा है. माझी खात्री आहे संजय राऊत पूर्वीपेक्षा ताकदीने मोठी झेप घेतील असं मला वाटतं,
असंही भास्कर जाधव म्हणाले. त्यांनी एकप्रकारे विरोधकांना इशाराच दिला आहे.

Web Title :-  MP Sanjay Raut |shivsena uddhav balasaheb thackeray leader bhaskar jadhav reaction after mp sanjay raut gets bail

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics | शिंदे गटातील खासदाराचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले – ‘महाविकास आघाडीचे लोक रात्री-बेरात्री मुख्यमंत्र्यांना…’

T20 World Cup | ‘या’ दोन टीममध्ये होणार टी20 वर्ल्ड कपची फायनल, ‘या’ दिग्गज खेळाडूने वर्तवली भविष्यवाणी