MP Sanjay Raut | अजित पवारांच्या प्रतिक्रेयेनंतर मविआमध्ये मतभेद असल्याची चर्चा, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन (Winter Session) सुरु असून गुरुवारी महाविकास आघाडीकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. यासंदर्भात बोलताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्याला याबद्दल काही माहित नसल्याची प्रतिक्रिया दिली. यावरुन मविआत मतभेत असल्याची चर्चा सुरु झाली. यावर बोलताना ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. मविआमध्ये मतभेद नसल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. तसेच अजित पवार यांची प्रस्तावावरील सही हा तांत्रिक मुद्दा असल्याचे संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी सांगितले.

नार्वेकर विरोधकांना बोलू देत नाहीत

यावेळी संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर देखील निशाणा साधला. राहुल नार्वेकर विरोधक आमदारांना बोलू देत नाहीत. विधानसभा अध्यक्षांनी असं पक्षपाती वागणं चुकीचं आहे. सर्वांना समान न्याय दिला पाहिजे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून विधानसभा अध्याक्षांविरोधात अविश्वासाचा प्रस्ताव दाखल केला असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

सीमावर्ती भागात मराठी भाषिकांवर अन्याय

यावेळी संजय राऊत यांनी सीमावादावर (Maharashtra-Karnataka Border Dispute) देखील प्रतिक्रिया दिली. बेळगाव आणि कर्नाटकच्या इतर सीमावर्ती भागात मराठी भाषिकांवर अन्याय सुरु आहे. त्यामुळे हा प्रदेश केंद्रशासित करावा अशी आमची मागणी आहे. मुंबईमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले लोक राहतात. सर्व आनंदाने राहत आहेत, मुंबईमध्ये अत्याचार होतो अशी कोणत्याही कन्नड भाषिक व्यक्तीची तक्रार नाही. त्यामुळे मुंबई केंद्रशासित प्रदेश करा अशी मागणी करणं मुर्खपणाचं असल्याचे राऊत यांनी म्हटलं.

Web Title :– MP Sanjay Raut | thackeray group leader sanjay rauts reaction on the disagreement in mahavikas aghadi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Traffic Police | उद्या (दि. 31 डिसेंबर) पुणे कॅम्प (लष्कर) परिसरातील वाहतूकीत बदल; फर्ग्युसन रोड आणि एमजी रस्ता 10 तासांसाठी नो-व्हेईकल झोन

Madhurani Gokhale Prabhulkar | मॉडर्न कपड्यांवरून ट्रोल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या युजरला अरुंधतीने दिले ‘हे’ सडेतोड उत्तर

Gautami Patil | सोलापुरात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी; प्रेक्षकांनी देखील धरला ठेका