MP Sanjay Raut | संजय राऊत यांची राज ठाकरेंवर नाव न घेता टीका; म्हणाले – ‘धमक्या देणाऱ्यांची एवढी ताकद नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंगे (Azaan On Loudspeakers) उतरवण्यासाठी 4 मे पर्यंतचा अल्टीमेटम (Ultimatum) दिला आहे. त्यावर शिवसेनेचे नेते (Shivsena leader) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी भाष्य केले आहे. मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, या देशात आणि राज्यात कायद्याचे राज्य आहे. अल्टीमेटमवर देश चालत नाही. जे धमकी (Threat) देत आहे त्यांच्यात एवढी ताकद नाही. परंतु त्यांच्या मागे काही अतृप्त आत्मे असल्याची टीका राज ठाकरे यांचे नाव न घेता खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केली.

 

खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) म्हणाले, शिवसेना अल्टीमेटमला भीक घालत नाही. राज्यात कायदा व सुव्यवस्था (Law and Order) राखण्यासाठी मुख्यमंत्री (CM), गृहमंत्री (Maharashtra Home Minister) सक्षम आहेत. हिम्मत नाही असे लोक छोटे मोठे पक्ष पकडून आमच्यावर हल्ले करत आहेत. पण त्याचा काहीच उपयोग होणार नाही. लोक सुज्ञ असून कायदा – सुव्यवस्था कोणीही बिघडवू शकत नाही. धमक्या देणाऱ्यांची तेवढी ताकद नसून त्यांनी आधी पक्ष सांभाळावा. जे सुपाऱ्या देत आहेत त्यांचा आधी शोध घेतला पाहिजे असेही ते म्हणाले.

 

शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या सारखं अनुभवी राष्ट्रीय नेतृत्त्व, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील (HM Dilip Walse-Patil) यांसारखे अनुभवी नेते राज्यात आहेत. त्यामुळे सुसंस्कृत महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करणे शक्य नाही कारण इथली जनता सुज्ञ आहे, असंही राऊत म्हणाले.

 

Web Title :- MP Sanjay Raut | the country does not run on ultimatum unsatisfied souls behind threats says sanjay raut

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा