MP Sanjay Raut | ‘बेईमान्यांवर वीर सावरकरही थुंकले होते, मग मी जी कृती…’, संजय राऊतांची प्रतिक्रिया

त्र्यंबकेश्वर : पोलीसनामा ऑनलाइन – शिंदे फडणवीस सरकारला (Shinde Fadnavis Government) जोडे मारण्याची जनता वाट पाहत आहे. ज्या पद्धतीने त्यांनी शिवसेनेशी (Shiv Sena) आणि ठाकरे कुटुंबाशी (Thackeray Family) बेईमानी केली आहे. जोडे मारायचे असतील तर त्यांनी स्वत:ला जोडे मारुन घेतले पाहिजेत. या कार्यकर्त्यांना काम नाही, त्यांना आज काम मिळेल असं म्हणत संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी शिंदे गटावर टीकास्त्र सोडलं. तसेच बेईमान्यांवर वीर सावरकरही (Veer Savarkar) थुंकले होते हा इतिहास आहे. मी तशी कृती केली तर चूक काय? असा सवाल संजय राऊतांनी (MP Sanjay Raut) विचारला. ते त्र्यंबकेश्वर येथे जात असून नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधला.

वीर सावरकरही थुंकले होते

मी कुणावरही थुंकलो नाही. वीर सावरकरांना एकदा कोर्टात आणलं गेलं. वीर सावरकरांनी पाहिलं की त्यांची माहिती देणारा बाईमान कोपऱ्यात (Maharashtra Politics News) उभा आहे. त्याच्याकडे पाहून वीर सावरकर थुंकले होते. त्यामुळे बेईमान्यांवर थुंकणं ही हिंदू संस्कृती, हिंदुत्वाचा एक भाग आहे. मी कुणावरही थुंकलो नाही. पण वीर सावरकरांनी बेईमान्यांवर थुंकणं ही संस्कृती असल्याचे दाखवून दिले. इतिहासामध्ये याची नोंद आहे, असंही संजय राऊत यांनी सांगितले.

त्यामुळे ही कृती झाली

मी वीर सावरकर यांचा भक्त आहे. लोकमान्य टिळक (Lokmanya Tilak), बाळासाहेब ठाकरे
(Balasaheb Thackeray) यांच्या चांगल्या गोष्टी आम्ही घेत असतो.
चीड आणि संताप कोणत्याही प्रकारे व्यक्त होऊ शकतो. मी थुंकलो कुठे मला दाखवा.
माझ्या दाताचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे त्यातून व्यक्त झालेली कृती आहे.
त्यांना असं वाटतं आहे की लोक आमच्यावर थुंकत आहेत. त्यांची ही मानसिकता आहे.
त्यांना झोपतही वाटतं ही लोकं आमच्यावर जोडे मारत आहेत. हे खरं आहे लोक त्यांच्यावर थुंकत आहेत.
मी कशाला ते व्यक्त करु? असेही राऊत म्हणाले.

Advt.

Web Title :  MP Sanjay Raut | veer savarkar also spat on dishonest people so what is wrong with the action i took sanjay raut statement in discussion

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | नारायणगाव पोलिस स्टेशन – एकाच तरुणीच अनेकांशी विवाह लावून लाखो रुपयांना लुबाडले

Maharashtra Talathi Bharati 2023 | सुशिक्षीत बेरोजगारांसाठी खुशखबर ! राज्यात तलाठी पदासाठी 4 हजार 625 जागांची मेगाभरती, शासनाकडून आदेश जारी

Maharashtra IAS Officer Transfer | राज्यातील 20 सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्या, वाचा संपुर्ण यादी

Pune Crime News | 10 टक्के व्याजाने घेतलेले पैसे परत केल्यानंतर देखील पैशासाठी तगादा लावणार्‍या सूरज म्हेत्रेविरूध्द खंडणीचा गुन्हा