MP Sanjay Raut | बिल्डर सूरज परमारच्या डायरीत कुणाचं नाव? संजय राऊतांची SIT चौकशीची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी ठाण्यातील बिल्डर सुरज परमार आत्महत्या प्रकरणी (Builder Suraj Parmar Suicide Case) गंभीर आरोप करत एसआयटी (SIT) नेमण्याची मागणी केली आहे. ठाण्यातील एक बिल्डर सुरज परमार यांच्या आत्महत्येनंतर जी डायरी सापडली त्या डायरीत सांकेतिक नाव आहेत. ती नावं कोणाची आहेत ती आम्हाला माहिती आहेत, असा गौप्यस्फोट संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी करत मुख्यमत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर निशाणा साधला. ते आज (रविवार) सकाळी माध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत (MP Sanjay Raut) म्हणाले, आमचे खासदार अरविंद सावंत (MP Arvind Sawant) यांनी एक विषय मांडला. ठाण्यातील एक बिल्डर सुरज परमार यांच्या आत्महत्येनंतर जी डायरी सापडली त्या डायरीत सांकेतिक नावं आहेत. ती नावं कोणाची आहेत ती आम्हाला माहिती आहेत. लावा त्यांच्या विरोधात SIT चौकशी. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान केला आहे आणि भाजप (BJP) त्यांना पाठीशी घालत आहे. लावा चौकशी, करा एसआयटी चौकशी.

 

म्हणून हे सरकार आलंय

सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती लागते. हे सरकार खोके गोळा करण्यासाठी आलेत. जनतेच्या प्रश्नावर सरकार स्थापन झालं नाही. शिवसेना फोडायची, संपवायची, महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान नष्ट करायचा यासाठी हे सरकार आलेलं आहे, अशा शब्दात संजय राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) हल्लाबोल केला.

 

सरकारचे हायकमांड दिल्लीत

Advt.

अनेक विषय आहेत. विरोधी पक्षांवर एसआयटी स्थापन केली जाते.
दिशा सालियानच्या (Disha Salian) आई-वडिलांना माध्यमांसमोर बोलू दिले जात नाही. ही दडपशाही आहे.
त्यांच्यामागे ईडी (ED), सीबीआय (CBI) लावतील. तिच्या आई-वडिलांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
शिंदे-फडणवीस यांचे हायकमांड दिल्लीला आहे. त्यांना वारंवार तिथे जावे लागते असा टोला राऊतांनी लगावला.

 

 

Web Title :- MP Sanjay Raut | whose name in builder suraj parmar dairy make
sit inquiry sanjay rauts allegations on shinde fadnavis government

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा