MP Sanjay Raut । फडणवीस 100 आमदार निवडून आणतात; बाळासाहेबांना ते का जमलं नाही? शिवसेना खासदार म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  अनेक वर्षांपासून भाजप (BJP) आणि शिवसेना (shiv sena) अशी एकत्र असणारी युती तुटली. आणि मुख्यमंत्री पदासाठी आग्रहीत असणारी शिवसेना ही काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) सोबत सत्ता स्थापन केली. मात्र, भाजपने मागील विधानसभा निवडणुकीमध्ये 105 आमदार निवडून आभाजपाला विरोधी बाकावर बसावं लागलं. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) नेतृत्त्वाखाली भाजपने (BJP) शतक गाठलं आहे परंतु, शिवसेनेने आजतागायत कधीही 80 च्या पुढे मजल मारली नाही. यामागचे कारण काय?, अशा सवालावर शिवसेना नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी याचं उत्तर दिलंय. (Fadnavis elects 100 MLAs; Why didn’t Balasaheb get it?)

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

तर महाराष्ट्रात तशी परिस्थिती नाही..

फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 100 हून जास्त जागा जिंकून दाखवल्या.
परंतु, बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) असतानाही शिवसेनेला (shiv sena) हा करिश्मा का करून दाखवता आला नाही? असा सवाल एका मुलाखती दरम्यान संजय राऊत (MP Sanjay Raut) यांना विचारण्यात आला.
त्यावेळी मुलाखती दरम्यान बोलताना राऊत (MP Sanjay Raut) म्हणाले, ‘ममता बॅनर्जींसमोर (Mamata Banerjee) पश्चिम बंगालमध्ये कोणाचंही आव्हान नाही. तिथे काँग्रेस जवळपास नाहीच.
तमिळनाडूत 2 प्रबळ प्रादेशिक पक्ष आहेत. तिथे काँग्रेसला Congress) संधी नाही.
उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष-बहुजन समाज पक्ष आहे.
बिहार राज्यात लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) बराच काळ सत्तेत होते.
मात्र, महाराष्ट्रात (Maharashtra) तशी परिस्थिती नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

पण आम्ही महारष्ट्राभर पोहचलो..

10-20 जागा जास्त जिंकल्या म्हणून कोणी मोठा होत नाही. सत्ता येत जात असते.
आम्ही तर बराच काळ विरोधी पक्षात राहिलो. परंतु, तरीही पक्ष टिकला.
शिवसेना (shiv sena) मुंबई आणि ठाण्याची वेस ओलांडेल, असं देखील कोणाला वाटलं नव्हतं.
परंतु, आम्ही महाराष्ट्रभर (Maharashtra) पोहोचलो आणि 55 वर्षे टिकलो असल्याचं देखील संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितलं आहे.

आमचा आवाज क्षीण झालेला नाही..

महाराष्ट्रात (Maharashtra) 4 प्रमुख पक्ष आहे. प्रत्येकाची स्वतंत्र स्पेस आहे. शरद पवारांची ताकद आहे. काँग्रेसला Congress) मानणारा मतदार आहे. म्हणून तर मागील निवडणुकीत कोणताही नेता नसताना त्यांचे 40 हून जास्त आमदार निवडून आले. कधीकाळी डाव्यांची संपूर्ण देशात ताकद होती. डावे देश चालवायचे. परंतु, आता त्यांचा आवाज क्षीण झाला. आमचा आवाज क्षीण झालेला नाही. आमचा आवाज कायम आहे, असं राऊत (Sanjay Raut) यांनी स्पष्ट केलं आहे.

हेच शिवसेनेचं यश..

महाराष्ट्रात (Maharashtra) काँग्रेसला (Congress) मोठा जनाधार आहे.
काँग्रेस पक्ष देशात इतर राज्यांत पराभूत होत असतानाही महाराष्ट्रानं काँग्रेसला आधार दिला.
सहकाराच्या माध्यमातून राज्यात जितकं काम झालं, तितकं देशात अन्यत्र कुठेही झालेलं नाही.
काँग्रेसची Congress) पाळमुळं इतकी घट्ट असतानाही शिवसेना (shiv sena) राज्यात वाढली.
55 वर्षे टिकली. हेच शिवसेनेचं यश आहे,’ असं संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे.

 

Web Title : MP Sanjay Raut | why shiv sena never wins more 100 seats assembly election mp sanjay raut explains

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update