MP Shreerang Barne | मावळ मतदारसंघ राष्ट्रवादीने मागितला, शिवसेनेने…; खा. श्रीरंग बारणेंनी सांगितलं शिंदे गटात जाण्याचे कारण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्याने शिवसेना (Shivsena) अडचणीत आली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत आधी 40 आमदार (MLA) गेले. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) अल्पमतात आले अन् उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्री (CM) पदावरुन पायउतार व्हावे लागले. त्यानंतर काही दिवसांनी शिवसेनेच्या 19 पैकी 12 खासदार शिंदे गटात सामील झाले. यामध्ये मावळचे खासदार श्रीरंग बारणे (MP Shreerang Barne) आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) अजित पवार (Ajit Pawar) यांचे पूत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांचा पराभव करत श्रीरंग बारणे (MP Shreerang Barne) जाएंट किलर ठरले. बारणे पुण्यात आल्यानंतर त्यांनी शिंदे गटात जाण्यामागे त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

 

श्रीरंग बारणे (MP Shreerang Barne) म्हणाले, भाजपसोबत (BJP) युती पाहिजे ही आमची भूमिका होती, याची मागणी आम्ही वारंवार केली. मात्र राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं. राष्ट्रवादीला (NCP) शिवसेनेला संपवायचं आहे, म्हणून हे पाऊल उचललं गेलं, असा आरोप बारणे यांनी केला आहे.

 

ते पुढे म्हणाले, मावळमध्ये पवार परिवारातल्या माणसाला हरवलं. ठाकरेंना मेसेज केला मग त्यांचा फोन आला, त्यात आपण युतीची मागणी केली. शिवसंपर्क अभियानाचा (Shiv Sampark Campaign) अहवाल देखील दिला. त्यामध्येही हीच मागणी पुढे आली होती. माझ्या विजयामध्ये भाजपचा वाटा असल्याचे बारणे म्हणाले.

आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत शेवटपर्यंत चर्चा करत होतो, त्यांनी सांगितलं तुम्हाला योग्य वाटेल ते करा,
मग मी शिंदे गटात (Shinde Group) जाण्याचा निर्णय घेतला, असे बारणे यांनी सांगितलं.
मावळ मतदारसंघ (Maval Constituency) राष्ट्रवादीला सोडण्याची मागणी केली गेली,
परंतु त्यावर शिवसेनेने विरोध देखील केला नाही, अशी खंत देखील श्रीरंग बारणे यांनी बोलून दाखवली.

 

Web Title :- MP Shreerang Barne | mawal shivsena mp shreerang barne
join cm eknath shinde group what uddhav thackeray said

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा